कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : सर्वांच्या नजरा पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्था चॅटर्जी यांच्याकडे आहेत. कारण कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय एसएससी भरती घोटाळ्यातील ( WB SSC Scam ) चौकशीच्या अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने यापूर्वीच अनेक दिग्गजांची चौकशी केली आहे. ज्यात माजी शिक्षण मंत्री पार्था चॅटर्जी ( Partha Chatterjee ) यांचाही समावेश आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या तपासात बरीच माहिती समोर आली आहे. पुराव्याच्या आधारे तपासकर्त्यांना बुधवारी मोठा निर्णय अपेक्षित आहे. सीबीआयने हात आखडता घेतला असला तरी, चॅटर्जी जेव्हा चौकशीसाठी जातील त्यावेळी त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्यात येऊ शकतो. उल्लेखनीय आहे की, कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांनी याआधी आदेश दिले होते की सीबीआय आवश्यक असल्यास पार्था चॅटर्जीला ताब्यात घेऊन चौकशी करू शकते.