गांधी नगर: बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया लागू केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मत ( CEC ON REAL SHIVSENA ) व्यक्त केले. खरी शिवसेना कोणाची या मुद्यावरून शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून थांबवावे, अशी विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज शिवसेनेची ही याचिका फेटाळली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगटाची शिवसेनाच खरी म्हणून ओळखण्याची आणि पक्षाच्या धनुष्य-बाण निवडणूक चिन्हाचे वाटप करण्याची याचिका ECI कडे प्रलंबित आहे, कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात खटल्यात अडकले होते.