Wild Elephant : विहिरीत पडलेल्या हत्तीची केली सुखरूप सुटका, पहा व्हिडिओ - Karnatakas Ramanagara
कर्नाटकातील रामनगरातील विहिरीतून जंगली हत्तीची ( Wild Elephant ) सुटका करण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी व शेतकऱ्यांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. ( Wild Elephant Rescued From well In Karnatakas )
कर्नाटक (रामनगरा) : जिल्ह्यातील चन्नापटना तालुक्यातील अम्मल्लीदोड्डी गावात जंगलातून अन्नासाठी आलेला वन्य हत्ती ( Wild Elephant ) विहिरीत पडला. एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत हत्ती पडला आणि उठायला धडपडत होता. वनविभागाचे कर्मचारी व शेतकऱ्यांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. हत्तीला विहिरीतून बाहेर पडता यावे यासाठी विहिरीचा काठ जेसीबीने खोदण्यात आला आहे. नंतर, हत्ती तेंगीनाकल्लू वनक्षेत्रात गेला. ही घटना नुकतीच घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Wild Elephant Rescued From well In Karnatakas )