नवी दिल्ली/नोएडा:तीन वर्षांपूर्वी सात फेऱ्या मारून सात जन्म एकत्र राहण्याचे व्रत घेतलेल्या पती-पत्नीने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या ( husband wife hanged in noida ) केली. हे प्रकरण नोएडातील सेक्टर 24 पोलिस स्टेशनच्या सेक्टर 22 चे आहे. जिथे एका 34 वर्षीय व्यक्तीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पतीला कॅन्सर झाल्याची माहिती पत्नीला समजताच पत्नीने सुसाईड नोट लिहून संपूर्ण घटनेचा दाखला देत दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्याचवेळी पोलिसांनी सुसाईड नोटमध्ये मृत व्यक्तीने लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर कुटुंबीयांना माहिती दिली.
Husband Wife Suicide : पतीला झाला कॅन्सर.. चिठ्ठी लिहून पती-पत्नीने घेतला गळफास - चिठ्ठी लिहून पती-पत्नीने घेतला गळफास
नोएडातील सेक्टर 24 पोलीस स्टेशनच्या सेक्टर 22 मध्ये गेल्या 8 वर्षांपासून भाड्याने राहणाऱ्या 34 वर्षीय अरुणचे तीन वर्षांपूर्वी शशिकला नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. अरुण हा मूळचा सोनभद्र येथील रहिवासी असून, तो सेक्टर 62 येथील एका खासगी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. लग्नानंतर अरुण पत्नी शशिकला यांना नोएडाला घेऊन आला. अलीकडेच डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत अरुणला शेवटच्या स्टेजचा कर्करोग झाला, त्यानंतर दोघेही तणावाखाली राहू लागले. या तणावातूनच दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली ( husband wife hanged in noida ) आहे.
नोएडातील ठाणे सेक्टर 24 परिसरातील सेक्टर 22 मध्ये गेल्या 8 वर्षांपासून भाड्याने राहणाऱ्या 34 वर्षीय अरुणचे तीन वर्षांपूर्वी शशिकला नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. अरुण हा मूळचा सोनभद्र येथील रहिवासी असून, तो सेक्टर 62 येथील एका खासगी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. लग्नानंतर अरुण पत्नी शशिकला यांना नोएडाला घेऊन आला. नुकतेच डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत अरुणला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर दोघेही तणावाखाली राहू लागले आणि अचानक दोघांनी एकत्र जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ज्यामध्ये ती स्वतः तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सांगत आहे. तसेच पतीला कॅन्सर झाल्याचा उल्लेखही तिने केला. यानंतर दोघेही एकाच फाशीवर गळफास घेत मृत पावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला.
पती-पत्नीने एकत्र केलेल्या आत्महत्येबाबत अधिक माहिती देताना, एसीपी-II नोएडा रजनीश वर्मा म्हणाले की, पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सुसाईड नोट जप्त केली. यासोबतच कॅन्सरचा रिपोर्टही आला असून, त्यात पती अरुण यांना कॅन्सर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुसाईड नोटवर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. इतर बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू आहे.