बंगळुरू- पती-पत्नीमधील घटस्फोटामागे वेगवेगळी कारणे असतात. मात्र, कर्नाटकमध्ये घटस्फोटापर्यंत प्रकरण जाण्याकरिता अजब कारण दिसून आले आहे. पत्नी रोज सहावेळा अंघोळ करत असल्याने तरुण त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याने घटस्फोटासाठी न्यायालयात ( Husband wants divorce files complaint in Bengaluru ) अर्ज केला आहे.
रोहित आणि सुमती ( बदललेली नावे ) हे दाम्पत्य हे बंगळुरूमधील आरटीनगरमध्ये राहतात. त्या दोघांचा 2009 मध्ये विवाह झाला आहे. रोहित हा तंत्रज्ञ आहे. विवाहानंतर तो लंडनमध्ये गेला होता. त्याची 35 वर्षांची पत्नी सुमती हे एमबीए पदवीधर आहे. ती लंडनमध्ये असताना घर टापटीप ठेवत होती.
हेही वाचा-Kanpur Triple Murder : मानसिक दबावखाली असलेल्या डॉक्टरने केली पत्नीसह दोन्ही मुलांची हत्या
मोबाईल आणि लॅपटॉप धुण्यासाठी डिटर्जंटचा वापर
दोघांना मुल झाल्यानंतर तिची स्वच्छतेची सवय आणखी वाढली. कामावरून घरी आल्यानंतर ती पतीला सतत कपडे, बूट आणि मोबाईल स्वच्छ करण्याची सूचना करत होता. तिच्या वागणुकीमुळे तरुण हा त्रस्त झाला होता. त्यानंतर दोघांनी काही वर्षांपूर्वी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तिचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनानंतर तिची अतिस्वच्छतेची सवय कमी झाली. मात्र, त्यांना दुसरे मूल झाल्यानंतर अतिस्वच्छतेची सवय पुन्हा जडली आहे. पत्नी मोबाईल आणि लॅपटॉप धुण्यासाठी डिटर्जंट वापरत असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.