मुंबई - लपाछपी खेळत असताना आपल्याला समोरचे काही दिसत नाही असा बहाना करून पत्नीने पतीवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रेदेशमधील अंकपल्ली जिल्ह्यातील बुचायापेटा येथे घडली आहे. ( Wife knife Attack On Husband In Andhra ) रामनायडू आणि रविकाथम येथील विय्यापू पुष्पा यांचा विवाह ठरला होता. (दि. 20 मे)रोजी ते विवाहबद्द होणार होते. हे दोघे समोवारी (दि. 18 एप्रिल)रोजी वड्डाडी येथे खरेदीसाठी गेले होते. त्यानंतर वापस येताना ही घटना घडली.
गंभीर जखमी - रामनायडू आणि रविकाथम येथील विय्यापू पुष्पा यांचा विवाह ठरला होता. त्यानंतर काही लग्नाचे खरीदी करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर वापस येताना ते कोमल्लापुडी उपनगरातील बाबा आश्रमात ते गेले. तेथे गेल्यानंतर ते दोघे डोळ्यावर पट्टी बांधून लपाछपीचा खेळ खेळत होते. दरम्यान, समोर काही दिसत नसल्याचा बहाणा करत त्या तरुणीने होणाऱ्या पतीवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये त्याच्या गळ्यावर चाकूचे गंभीर वार झाले. ज्यामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणता रक्त वाहत होते.