महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Crime News : विवाहबाह्य संबंध, पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा!

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील हत्येचा खुलासा करत (murder in lakhimpur kheri) पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. (wife killed husband with help of lover) (UP Crime News).

murder in lakhimpur kheri
लखीमपूर खेरी येथे हत्या

By

Published : Dec 31, 2022, 5:08 PM IST

लखीमपूर खेरी (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे पती पत्नीच्या प्रेमसंबंधातून पतीची हत्या करण्यात आली. (wife killed husband in lakhimpur kheri). पोलिसांनी 12 तासांतच पतीच्या हत्येचा खुलासा केला आहे. (murder in lakhimpur kheri). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह घराजवळ पुरला. पोलिसांनी पत्नी जुली आणि संतोष कुमार पाल यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. यासोबतच त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले हत्यारही जप्त केले गेले आहे. (wife killed husband with help of lover)

मृतदेह घराजवळ पुरला : प्रभारी निरीक्षक निघासन अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी निघासन पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की, सिंघाही रोडवरील निघासन शहरात राहणारा बनवारी याची त्याच्याच पत्नीने हत्या करून त्याचा मृतदेह घराजवळ पुरला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आणि 302 आणि SCST कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

गुन्हा केला कबूल : एसपी संजीव सुमन यांनी सीओ निघासन यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आणि या घटनेचा लवकरच पर्दाफाश करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने मृताची पत्नी जुली आणि तिचा कथित प्रियकर संतोष कुमार पाल यांना 12 तासांच्या आत अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युलीने चौकशीत सांगितले की, संतोषसोबत तिचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र तिचा पती त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. या दोघांनी त्याचा गळा चिरून हत्या केली आणि मृतदेह घराजवळील जमिनीत पुरला. पोलिसांनी प्रियकर संतोष आणि मृताची पत्नी ज्युली यांना अटक करून हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त केले. इन्स्पेक्टर अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details