चतरा (झारखंड) : घरगुती वाद आणि छळाला कंटाळून एका विक्षिप्त पत्नीने चक्क पतीला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Wife burnt husband in Chatra). पत्नीने पतीला कपड्याने हातपाय बांधून रॉकेल ओतून जाळले. या घटनेत पती विनोद भारती गंभीर भाजला आहे. ग्रामस्थांनी त्याला घाईघाईने उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल केले. (wife burnt husband in domestic dispute).
Wife Burnt Husband : घरगुती वादातून पत्नीने पतीला जाळले - हजारीबाग वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व आरोपी पत्नी रुंती देवी हिला अटक केली. यापूर्वीही रुंतीने पतीला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. (Wife burnt husband in Chatra).

Etv Bharat
यापूर्वीही मारण्याचा प्रयत्न केला आहे : रुग्णाची गंभीर स्थिती पाहून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला हजारीबाग वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी रेफर केले. रात्री उशिरा ही घटना घडली. चतरा पोलीस स्टेशन हद्दीतील जयपूर गावातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व आरोपी पत्नी रुंती देवी हिला अटक केली. यापूर्वीही रुंतीने पतीला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.