नवी दिल्ली -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर ट्विटरकडून नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टीक रिस्टोर केली आहे. ब्लू टिक असलेले अकाऊंट हे अधिकृत अकाऊंट असल्याचे प्रमाण आहे.
ट्विटरचे स्पष्टीकरण -
जुलै 2020 पासून व्यंकय्या नायडू ट्विटरवर सक्रिय नव्हते. यामुळे ट्विटरच्या पडताळणी धोरणानुसार ब्लू टिक हटवण्यात आली होती, अशी माहिती ट्विटरने दिली. दरम्यान, ट्विटरकडून नायडूंच्या अकाऊंटवर ही ब्ल्यू टिक रिस्टोर करण्यात आली आहे.