चेन्नई -आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचे संस्थापक आणि देशाच्या फाळणीचे खलनायक असलेले मोहम्मद अली जिन्ना ( jinnah tower in Andhra Pradesh ) यांच्या नावाचे एक टॉवर आहे. सध्या हे टॉवर ( Guntur's Jinnah Tower ) चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी या इमारतीवर हिंदू वाहिनीच्या लोकांनी तिरंगा फडकवण्याचा हट्ट धरला होता. त्यावरून बरेच प्रकरण पेटले होते. आता त्या टॉवरला तिरंग्याचा रंग देण्यात आला आहे.
जिन्ना टॉवर तिरंग्यात रंगवल्यानंतर आता त्यावर तिरंगा फडकावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. जिन्ना टॉवरवर तिरंगा फडकवण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. टॉवर तिरंग्यात रंगवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुंटुर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा ( YSRCP MLA Mohammad Mustafa ) यांनी सांगितले.
स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरूद्ध काही मुस्लिमांनी लढा दिला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही मुस्लिम देश सोडून पाकिस्तानमध्ये गेले. पण आम्ही देशातच राहणं पसंत केलं. आमचं मातृभूमीवर प्रेम आहे, असे मोहम्मद मुस्तफा यांनी म्हटलं.
टॉवरला अब्दुल कलामांचे नाव द्या -