स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती (World Menopause Day celebrated) म्हणतात. स्त्रीयांमध्ये वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी मासिक पाळीला सुरुवात होते. ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे, असा होतो. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण ४५ वर्षे वयापर्यंत चालू राहते. त्यानंतर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येते व बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे किंवा बीज ग्रंथीमध्ये आंतररस तयार होणे थांबल्यामुळे, मासिक पाळी कायमची बंद होते. त्याला रजोनिवृत्ती असे महणतात. रजोनिवृत्ती हळूहळू किंवा एकदमच होऊ शकते. रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीमध्ये शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे (symptoms and effects) बदल घडतात. जागतिक रजोनिवृत्ती दिन दरवर्षी 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.Good Health
रजोनिवृत्तिची कारणे : रजोनिवृत्ति झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे पविर्तन होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने, स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु, काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तिला इंग्रजीमध्ये मेनोपॉज़ म्हणतात. ज्याचा अर्थ 'जीवनात परिवर्तन' हा आहे. हा काळ वास्तवात स्त्रीच्या जीवनातील परिर्तनकाळ असतो. या काळाचा प्रारंभ झाल्यावर मनामध्ये निरुत्साह, शरीरातील शिथिलता, झोप न येणे, डोके दुखणे तथा शरीरातील भिन्न भिन्न भागात दुखणे अनेक प्रकारची असुविधा, बेचैनी असणे इत्यादी लक्षण प्रकट होतात. बहुतांश महिलांच्या शरीरात स्थूलता येते. आनुवंशिक या वैयक्तिक उन्मादी प्रवृत्तितील महिलांना उन्माद, किंवा पागलपन येण्याची आशंका असते.