नऊ रात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला (Dussehra 2022) सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, दसर्याला आपटा व शमीच्या पानांना (Why is gold gave on Dussehra to each other) का विशेष महत्त्व आहे.
यामुळे लुटले जाते सोने :रघुजीराजाच्या काळची पुराण कथा आहे, वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स होता. चौदा विद्यामंध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले. गुरूऋणातून मुक्त होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले. विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण हीच माझी गुरू दक्षिणा, असे गुरूने सांगितले. मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला. तेव्हा गुरूंनी सांगितले की, चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे. गुरूंना वाटले कौत्स आता गुरूदक्षिणेचा नाद सोडून देईल. कौत्स रघुराजाच्या दरबारी गेला. त्यास सगळी परिस्थिती निवेदन केली. राजाकडेही एवढे द्रव्य नव्हते म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करून द्रव्य मिळवण्याचा बेत केला. रघुराजाच्या स्वारीची कुणकुण लागताच कुबेराने नगरीच्या वेशीबाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. या सुवर्ण मुद्रा ज्या झाडा वर पडल्या ते झाड आपट्याचे होते. त्या घेऊन जा म्हणून कौत्साला सांगितले. १४ कोटींपेक्षा एकही जादा सुवणमुद्रा त्याने घेतली नाही. दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार. शेवटी त्या सुवर्णमुद्रा नगरजनांनी लुटून न्याव्यात असा सुवर्णमध्य काढण्यात आला. तो दिवस होता विजयादशमीचा. म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते, अशी आख्याय़िका आहे.
शस्त्रपूजन :दसऱ्याच्या सणाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विजादशमी हा सण साजरा केला जातो. यावेळी 05 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या सणाशी संबंधित अनेक श्रद्धा आहेत. या दिवशी चांगल्या विजयाने रावणाचा वध केला. असेही मानले जाते की, देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. देशभरात वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो. पण उर्जा सर्वत्र सारखीच राहते. तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये याला आयुधा पूजा म्हणून ओळखले जाते. तर महाराष्ट्रात ती खंडे नवमी या नावाने साजरी केली जाते. उत्तर भारतात याला 'शस्त्रपूजन' (The reason behind weapon worship is special) केम्हणतात.
शस्त्रपूजा का केली जाते :दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. अश्विन शुक्ल पक्ष दशमीला शस्त्रपूजन केले जाते. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या पूजेनंतर दसऱ्याचा सण साजरा केला जातो. विजयादशमीला दुर्गा देवीची पूजा केली जाते. माँ दुर्गा शक्तीचे प्रतीक आहे. भारतातील संस्थानांमध्ये शस्त्रपूजा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. आता संस्थानं राहिलेली नाहीत तर परंपरा शाश्वत आहेत. यामुळेच या दिवशी स्वसंरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचीही पूजा केली जाते. शस्त्रे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेले कार्य शुभ फल देते. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी या दिवशी शस्त्र पूजन करावे, असेही सांगितले जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते. त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते.
अशी आहे शस्त्र पूजा आख्यायिका :- षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते तिचे नाव विजया आहे. जगतजननी मत भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे, तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात, तसेच भरण पोषणाचे साधनही असतात. या अस्त्रांमध्ये विजय देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते. त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते.