देशभरात 23 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय शेतकरी दिन' (National Farmers Day) साजरा केला जात (Farmers Day celebrated only on 23rd December in India) आहे. यानिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र हा दिवस फक्त भारतात 23 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वास्तविक, हा विशेष दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे मसिहा म्हणुन ओळखले जाणारे चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय चौधरी चरणसिंग यांना जाते. स्वत: शेतकरी असल्याने त्यांना शेतकर्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती, त्यामुळे त्यांनी शेतकर्यांसाठी अनेक सुधारणा केल्या होत्या.
अनुदान दिले जाते :देशाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सन्मान दिला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविते. शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करणे हा या विशेष दिवसाचा उद्देश आहे. देशात या निमित्ताने शेतकरी जागृतीपासून अनेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत.
शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न :हा दिवस साजरा करण्यामागील आणखी एक उद्देश हा आहे की, यातून समाजातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण घेऊन सक्षम बनवण्याची कल्पना येते. शेतकरी दिन साजरे केल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल लोकांना शिक्षित केले जाते.
शेतकऱ्याशिवाय जगणे अवघड आहे :अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही, हे सांगण्याची गरज नाही आणि शेतक-यांनी उत्पादित केलेले धान्य, कडधान्ये आणि फळे आणि भाजीपाला यातूनच आपल्याला बहुतांश अन्न मिळते. शेतात काबाडकष्ट करून शेतकरी जे उत्पादन करतात, त्यावरच आमची पोटे भरतात. आमच्याकडे शेतकरी नसतील तर, आम्ही अस्तित्वात राहू शकणार नाही. शेतकरी दिन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, तर आपल्या देशात दरवर्षी 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिन साजरा केला जातो.
शेतकऱ्यांच्या समस्या : आज देशात जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक कारणांमुळे शेतकरी आत्मह्त्या करीत आहेत. अनेक शेतकरी कर्जाने डूबले आहे. यासाठी सरकारने आणि इतर अनेक आर्थिक दृष्ट्या सक्षम लोकांनी योग्य ती पाऊले उचलुन, त्यांची मदत करायला हवी.