रावण व त्याच्या बांधवांनी कडक तपश्चर्या करुन ब्रम्हाजींना वरदान मागितला होता. दरम्यान रावणाने अमरत्वाचा वरदान मागितला होता. त्याला मिळालेल्या वरदान प्रमाणे, त्याच्या नाभी मध्ये अमृत कलश होते. ज्यामुळे तो आणि त्याच्या शरीराचा प्रत्येच अवयव चिरकाल जिवंत राहणार होते. यामुळेच, रामायणातील युध्दा दरम्यान जेव्हा जेव्हा श्री राम आपल्या बाणाने रावणाचे शिर किंवा त्याच्या शरीराचा कुठलाही अवयव कापुन टाकत होते. त्यावेळी ते आपोआप परत जोडल्या Why did Ravana keep coming back to life after death जात होते.Dussehra 2022
ब्रम्हास्त्र :तसेच, ब्रम्हदेवाने वरदान देतांना एक बाण म्हणजे ब्रम्हास्त्र रावणाला दिले होते. केवळ आणि केवळ याच ब्रम्हास्त्राने रावणाचा वध होऊ शकत होता. इतर कुठलीही शक्ती किंवा बाण रावणाचे काहीही बिघडवु शकत नव्हते. आणि रावणाने हे ब्रम्हास्त्र आपल्या घरी, त्याची अगदी विश्वासू बायको मंदोदरी जवळ गुप्त ठीकाणी ठेवायला दिले होते. मात्र, रावणाचा एक भाऊ जो चांगल्या कर्मावर प्रचंड विश्वास करत होता. आणि आपल्या भावाचे म्हणजेच रावणाचे वागणे त्याला पटत नव्हते. म्हणुन तो श्री रामाशी युध्दा दरम्यान सोबत होता. त्याने रावणाच्या वरदान व मृत्यूशी संबधित सर्व गोष्टी रामाला सांगितल्या होत्या. आणि त्यानंतरच रावणाचा वध झाला होता, असे रामायणामध्ये सांगितले आहे.
मायावी रावण : रावणाला दहा डोकी असल्याची चर्चा रामायणात आहे. कृष्ण पक्षातील अमावास्येला तो युद्धासाठी गेला होता आणि प्रत्येक दिवशी अनुक्रमे त्याचे एक एक शिरच्छेद केले जात होते. अशा प्रकारे दहाव्या दिवशी म्हणजे शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी रावणाचा वध केला जातो. रामचरितमानसातही उल्लेख आहे की, रामाने जेव्हा जेव्हा बाणाने रावणाचे मस्तक कापले, त्याच्या जागी दुसरे मस्तक परत येत होते. खरे तर रावणाची ही मुंडके कृत्रिम - राक्षसी भ्रमाने बनलेली होती. रावण चांदीचे ठिपके असलेले मरीच सोन्याचे हरीण बनला होता. तसेच, सितेला पळवुन नेण्यासाठी साधुचे रुप घेतले. रामाचे छिन्नविच्छेदन केलेले मस्तक सीतेसमोर ठेवले, इत्यादी गोष्टींवरुन रावण मायावी होते हे सिद्ध होते. त्याला इंद्रजलाचे अनेक प्रकार माहित होते. त्यामुळे रावणाची दहा डोकी आणि वीस हातही कृत्रिम मानता येतील. पण काही विद्वानांचे असे मत आहे की, रावणाच्या दहा डोक्याची चर्चा प्रतीकात्मक आहे - त्याच्याकडे दहा पुरुषांची बुद्धिमत्ता आणि दहा पुरुषांची ताकद होती, असे मानतात.
मांडवी : आदिवासींच्या श्रद्धेनुसार ते रावणाला आपला पूर्वज मानतात आणि त्यांच्यातील अनेक तथ्येही खरी आहेत. कारण संपूर्ण देशात जिथे सर्व धर्माचे लोक अगदी ब्राह्मण आणि तामिळ लोक दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करतात. तिथे संपूर्ण भारतातील आदिवासी (रावणाच्या) ते त्यांच्या शूर राजा रावण मांडवीच्या मृत्यूबद्दल शोक करतात, ते गोंगोची पूजा करतात. यात दशानन म्हणजे आदिवासींचा राजा होय. आदिवासींचे रावणाला आपला पुर्वज मानतात. त्याला आदिवासी समाजातील गोंड जमातीचा सदस्य मानतात आणि त्याला सात गोत्र मानतात. ते राजा रावणाला 'मांडवी' म्हणतात.Dussehra 2022