महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकांना का लक्ष्य केले जात आहे? वाचा... - दहशतवाद्यांकडून नागरिकांची हत्या श्रीनगर

जिल्ह्यातून एक महिला प्रचार्य आणि एका शिक्षकावर अतिरेक्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना इदगाह येथील गव्हरमेंट बॉईज हायर सेंकडरी स्कूलमध्ये घडली. प्राचार्य सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद अशी मृतांची नावे आहेत. मागील 5 दिवसांत नागरिकांच्या हत्येची ही 7 वी घटना आहे, ज्यातील 6 श्रीनगरमधील आहे. दहशतवाद्यांकडून सामान्यांना का लक्ष केले जात आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

principle and a teacher killed Shrinagar
श्रीनगर शाळेत गोळीबार प्राचार्य मृत्यू

By

Published : Oct 7, 2021, 5:27 PM IST

Updated : Oct 7, 2021, 10:42 PM IST

श्रीनगर (ज.का) - जिल्ह्यातून एक महिला प्रचार्य आणि एका शिक्षकावर अतिरेक्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना इदगाह येथील गव्हरमेंट बॉईज हायर सेंकडरी स्कूलमध्ये घडली. प्राचार्य सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद अशी मृतांची नावे आहेत. मागील 5 दिवसांत नागरिकांच्या हत्येची ही 7 वी घटना आहे, ज्यातील 6 श्रीनगरमधील आहे. दहशतवाद्यांकडून सामान्यांना का लक्ष केले जात आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस महासंचालक दिलबाग सिंह

हेही वाचा -माझ्यावर राजीनाम्याचा कोणताही दबाव नाही; अजय मिश्रा तेनी यांची प्रतिक्रिया

..म्हणून नागरिकांवर हल्ला?

या हल्ल्यांवर राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. दहशतवाद्याचे हल्ले हे स्थानिक मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. काश्मीरमधील सांप्रदायिक सौहार्द नष्ट करण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. यातून दहशतवाद्यांची निराशा आणि त्यांची क्रृरता स्पष्ट दिसून येते. दहशतवादी काश्मीरमधील शांती मिटवू पाहत आहेत, मात्र आम्ही त्यांच्या योजना यशस्वी होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया दिलबाग सिंह यांनी दिली.

मंगळवारी 3 नागरिकांची हत्या

दहशतवाद्यांनी मंगळवारी (5 ऑक्टोबर) 7.30 वाजता इकबाल पार्क परिसरात प्रसिद्ध फार्मासिस्ट माखनलाल बिंदू (68) यांना ठार केले. दहशतवाद्यांनी मेडिकलमध्ये शिरून त्यांच्यावर गोळीबार केला होता. बुधवारी त्यांची मुलगी श्रद्धा बिंदू यांनी दहशतवाद्यांना युक्तिवाद करण्याचे आवाहन केले होते.

मंगळवारीच रात्री 8.30 वाजता दहशतवाद्यांनी लाल बाजार परिसरात विरेंद्र पासवान या व्यक्तीची हत्या केली. त्यांचा पाणीपुरीचा व्यवसाय होता आणि ते बिहारच्या भागलपूर येथील रहिवाशी होते. त्याचबरोबर, 8.45 वाजता दहशतवाद्यांनी बांदीपोरच्या शाहगुंड भागात एका नागरिकाची हत्या केली होती. मोहम्मद शफी लोन, असे या व्यक्तीचे नाव आहे.

शनिवारी 2 नागरिकांची हत्या

शनिवारी कारा नगर भागात दहशतवाद्यांनी स्थानिक अब्दुर रहमान गुरू यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. ते श्रीनगरच्या चट्टाबलच्या गालवांटेंग भागातील रहिवाशी होते. तसेच, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या एसडी कॉलनी बटमालू येथे एका सामान्य नागरिकावर गोळीबार केला. यात नागरिकाचा मृत्यूझाला होता. मोहम्मद शफी डार, असे त्यांचे नाव होते.

हेही वाचा -कर्नाटक: मुसळधार पावसाने घर कोसळले; बेळगाव जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू

Last Updated : Oct 7, 2021, 10:42 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details