महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या समारोपापूर्वी अजित पवार कार्यक्रमातून गायब, चर्चेला उधाण - नवी दिल्ली राष्ट्रवादी अधिवेशन न्यूज

कोविडच्या काळात अजित पवार यांनी केलेल्या अर्थ मंत्रालयाच्या हाताळणीचे कौतुक ( Ajit Pawar in corona crisis ) करण्यात आले. मात्र, समारोपापूर्वी अंतिम वक्ता म्हणून अजित पवार कार्यक्रमात नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Sep 11, 2022, 8:13 PM IST

नवी दिल्ली- राष्ट्रवादीच्या दिल्लीमधील अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री आणि राज्य विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामगिरीसाठी सर्वात मोठा जल्लोष आला. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे ( supriya sule name call Ajit Pawar ) यांनी नाव पुकारण्यापूर्वी अजित पवार गायब होते. अधिवेशनाच्या ( NCP Convention in New Delhi ) समारोपापूर्वी अजित पवार यांनी अधिवेशनातून काढता पाय घेतल्याने चर्चेला उधाण ( Ajit Pawar displeasure ) आले आहे.

कोविडच्या काळात अजित पवार यांनी केलेल्या अर्थ मंत्रालयाच्या हाताळणीचे कौतुक ( Ajit Pawar in corona crisis ) करण्यात आले. मात्र, समारोपापूर्वी अंतिम वक्ता म्हणून अजित पवार कार्यक्रमात नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अनेक विरोधी पक्षांचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या निगराणीखाली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar speech in NCP program ) यांनी ठाम भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की दिल्लीतील सत्ताधाऱ्यांपुढे कधीही शरण जाणार नाही. यावेळी त्यांनी बिगर भाजप पक्षांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

लोकशाही पद्धतीने आव्हान द्यावे लागेलराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना पवार यांनी मोदी सरकारवर वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे आंदोलन आणि देशातील धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्धचा द्वेष वाढवल्याबद्दल टीका केली. शरद पवार म्हणाले, की ईडी, सीबीआय आणि मनी पॉवर सारख्या केंद्रीय एजन्सींचा गैरवापर करणार्‍या सध्याच्या सरकारला आम्हाला लोकशाही पद्धतीने आव्हान द्यावे लागेल. आम्हाला लढा देण्यासाठी तयार राहावे लागेल. सोनिया गांधी, राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला, पी चिदंबरम, कार्ती चिदंबरम, संजय राऊत, नवाब मलिक, अभिषेक बॅनर्जी, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया यांच्यासह विरोधी पक्षांची केंद्रीय एजन्सीकडून चौकशी चौकशीत आहेत. याच ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी १७३७ मध्ये आपल्या सैन्यासह तळ ठोकला होता आणि दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आव्हान दिले होते, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details