नवी दिल्ली -भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक असून याचा प्रसार झपाट्याने होत आहे. या व्हेरिएंटला 'इंडियन व्हेरिएंट' म्हणून संबोधण्यात येत आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही देशाचा नाही तर कोरोना व्हेरियंटचा वैज्ञानिक नावानेच उल्लेख करावा, अशी विनंती जागतिक आरोग्य संघटनेने केली.
भारतात आढळलेला B.1.617 हा कोरोना व्हेरियंट हा भारतीय व्हेरियंट असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या 32 पानाच्या अहवालात B.1.617 या कोरोना व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट म्हटलेलं नाही. भारतीय व्हेरियंटसंदर्भातील बातम्या तथ्यहीन आहेत, असे केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं आहे.
तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्या देशात कोरोनाचे नवे प्रकार नोंदवले गेले आहेत. त्या देशाच्या नावावरून कोरोनाचा प्रकार ओळखला जात नाही. सर्वांना वैज्ञानिक नावांनी व्हेरिएंटचा उल्लेख करावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
B.1.617 व्हेरियंट चिंताजनक -