पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात आज पाटणामध्ये 18 विरोधी पक्षांची बैठक होता आहे. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा होणार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोध पक्ष एकत्र आले आहेत. आज सकाळी 11 वाजेपासून या बैठकीला सुरुवात झाली असून दुपारी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. दरम्यान या बैठकीवरुन भाजपकडून टीका केली जात आहे. नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. भाजप खासदार रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांच्या या बैठकीवर प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली. सर्वजण वऱ्हाडी आहेत, लग्नाची वरात सजवली जात आहे, पण यातील नवरदेव कोण आहे? असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.
पाटणामध्ये नितीशी कुमार 2024 साठी वरात सजवत आहेत. वरातीत नवरदेवही असतो. परंतु या वरातीचा नवरदेव कोण आहे? ही अडचण आहे. सर्वजण पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. नितीश कुमार आणि केजरीवाल सर्वजण आपला अजेंठा चालवत आहेत. यात राहुल गांधी आणि शरद पवार आणि ममता बॅनर्जीही सहभागी आहेत. -रवीशंकर प्रसाद, भाजप खासदार
या वरातीचा नवरदेव कोण : तर भाजप खासदार सुशील मोदी यांनीही विरोधी पक्षाच्या बैठकीवर टीका केली आहे. सुशील कुमार म्हणाले की, नितीश कुमार यांनी अशी वरात सजवली आहे की, ज्यात सर्वजण नवरदेव आहेत. सर्वजण आपल्या अटी मांडत आहेत. यांचे मन जुडले नाही तरी हे हातात हात नक्कीच घेतील. ममता बॅनर्जी काँग्रेसशी तडजोड करणार का? बंगालमध्ये काँग्रेससाठी त्या जागा सोडणार का? बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारात अर्धा डझनहून अधिक काँग्रेसजन मारले गेले.