महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरला ठकराल यांच्यावर गुगल डुडल, कोण होत्या त्या? जाणून घ्या.. - Sarla Thukral doodle

आज भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांची 107 वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी गुगले आज एक डुडल त्यांना समर्पित केले आहे.

Sarla Thukral pilot
सरला ठकराल डुडल

By

Published : Aug 8, 2021, 7:58 PM IST

Updated : Aug 8, 2021, 8:39 PM IST

हैदराबाद -आज भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांची 107 वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी गुगले आज एक डुडल त्यांना समर्पित केले आहे.

हेही वाचा -पाण्यावरून हवेत तयार झाला 40 फुट उंचीचा भोवरा, पाहा VIDEO

कलाकार वृंदा झवेरी यांनी या डुडलची निर्मिती केली आहे. या डुडलमध्ये एक महिला साडी घालून विमान उडवत असल्याचे दिसून येत आहे. सरला यांचा जन्म 8 ऑगस्ट 1914 साली दिल्ली येथे झाला होता. त्यानंतर सरला लाहोरला गेल्या. त्यांना वैमानिक होण्यासाठीचे प्रोत्साहन त्यांच्या पतीपासून मिळाले, जे एक एअरमेल वैमानिक होते.

वयाच्या 21 व्या वर्षी सरला या पारंपरिक साडी घालून लहान दुहेरी पंख असलेल्या विमानात स्वार झाल्या होत्या. हे त्यांचे विमानातून पहिले उड्डाण होते. सरला यांनी विमानाला आकाशात नेत एक इतिहास रचला होता. सरला ठकराल या लाहोर फ्लाईंग क्लबच्या विद्यार्थी होत्या. त्यांनी 'ए' परवान्यासाठी 1 हजार तासांचा उड्डाण वेळ पूर्ण केला होता. हे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

त्यानंतर व्यावसायिक वैमानिक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने त्यांच्या नागरी विमान प्रशिक्षणाला ब्रेक लागला. मात्र, त्या थांबल्या नाही. त्यांनी लाहोर येथील मेयो स्कूल ऑफ आर्ट (नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट) येथे फाईन आर्ट आणि पेंटींगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या दिल्लीला परतल्या आणि येथे त्यांनी पेटींग करणे सुरू ठेवले आणि दागिने आणि कपडे डिझाइनींगमध्ये यशस्वी करिअर केले, अशी माहिती गुगलच्या डुडल पेजवर देण्यात आली आहे. सरला या वैमानिक क्षेत्रात काम करू इच्छीणाऱ्या महिलांच्या प्रेरणास्रोत आहेत.

हेही वाचा -कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र डोस प्रभावी; ICMR च्या अभ्यासाचा निष्कर्ष

Last Updated : Aug 8, 2021, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details