नवी दिल्ली -राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून ( NDA president candidate Draupadi Murmu ) झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली. मुर्मू यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. 18 जुलैला या पदासाठी निवडणूक पार पडली आहे. यात मुर्मू ( Draupadi Murmu NDA candidate ) यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. विजय झाल्यास मुर्मू ( Draupadi murmu news ) या देशातील पहिल्या आदिवसी राष्ट्रपती होणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने द्रोपदी मुर्मू यांनाच निवडले. कोण आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत आज आपण जाणून घेऊया.
हेही वाचा -Fire on INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्यला लागली आग, कुठलीही जीवितहानी नाही
अध्यक्षपदासाठी भाजपने यावेळी आदिवासी चेहऱ्यावर डाव खेळला आहे. गेल्या वेळी भाजपने राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा पुढे केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी होते. आणि 2017 मध्ये, एनडीएकडून उमेदवार बनण्यापूर्वी ते बिहारच्या राज्यपालपदावर होते. अशा स्थितीत दलितांपाठोपाठ आता आदिवासींकडेही भाजपने मोर्चा वळवला आहे. द्रौपदी मुर्मू संथाल कुटुंबातील आहेत. त्या मूळच्या ओडिशाच्या आहेत. (2000 ते 2004) या काळात त्या ओडिशाच्या आमदारही होत्या.
कोण आहेत द्रोपदी मुर्मू?
- द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. पाच वर्षांची टर्म पूर्ण करणाऱ्या पहिल्या राज्यपाल ठरल्या.
- झारखंडची स्थापना 2000 साली झाली. त्यानंतर 2015 ते 21 दरम्यान मुर्मू या राज्यपाल होत्या.
- द्रौपदी मुर्मू या मुळच्या ओडिशा राज्याच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात.
- ओडिशात त्या भाजपा - बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या.
- 2000 ते 2004 दरम्यान त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या.
- विशेष म्हणजे, द्रौपदी मुर्मू यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र दुखाने भरलेले आहे. मुर्मू यांच्या पतीचे निधन झालेले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.