महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण; जाणून घ्या त्यांच्याविषयी... - Adi Shankaracharya Samadhi statue

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य असे आद्य शंकराचार्य यांना म्हटलं जाते. हिंदू धर्माच्या एकीकरणात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. आज त्यांच्याविषयी जाणून घ्या...

Who iis Adi Guru Shankaracharya? Know about the saint
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण; जाणून घ्या त्याच्याविषयी...

By

Published : Nov 5, 2021, 1:18 PM IST

केदारनाथ - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी केदारनाथ धामला पोहोचले. यावेळी त्यांनी केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला. यानंतर श्री आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. आदि शंकराचार्य यांची मूर्ती 13 फूट उंच असून तिचे वजन 35 टन आहे. केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आदि शंकराचार्यांनीच केला होता हे विशेष.

कोण होते आदि शंकराचार्य ?

हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य आद्य शंकराचार्य यांनी चार मठांची स्थापना केल्याची माहिती आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला त्यांची जयंती साजरी केली जाते. केरळमध्ये जन्मलेले आदि शंकराचार्य 8 व्या शतकातील भारतीय आध्यात्मिक नेते होते. त्या काळात त्यांनी विविध पंथांमध्ये विभागलेल्या हिंदू धर्मांना जोडण्याचे काम केले. त्यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धांत दृढ केला आणि भारतभर चार मठांची स्थापना केली.

चार दिशांना चार मठांची स्थापना -

हिंदू धर्माच्या एकीकरणात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. रामेश्वरममधील शृंगेरी मठ, ओडिशाच्या पुरी येथील गोवर्धन मठ, गुजरातच्या द्वारका येथील शारदा मठ, उत्तराखंडमधील ज्योतिर मठ हे त्यांनी स्थापन केलेले चार मठ आहेत. हे चार मठ भारताच्या चारही दिशांना आहेत. या मठांच्या स्थापनेमागे आदि शंकराचार्यांचा उद्देश संपूर्ण भारताला एका धाग्यात बांधण्याचा होता, असे म्हटलं जातं.

आदि शंकराचार्यांची मूर्ती-

आदिगुरू शंकराचार्य समाधीची मूळ मूर्ती 2013 मध्ये नैसर्गिक आपत्तीत वाहून गेली होती. त्यानंतर आदि शंकराचार्यांची मूर्ती पुन्हा स्थापित करण्यात आली आहे. ही मूर्ती मंदिराच्या मागे स्थापित आहे. जिथे शंकराचार्यांनी समाधी घेतली. त्याच वेळी, या मूर्तीच्या बांधकामासाठी सुमारे 130 टन एक खडक निवडण्यात आला. ही मूर्ती म्हैसूर येथील एका शिल्पकाराने बनवली आहे. मूर्ती कोरल्यानंतर तिचे वजन सुमारे 35 टन ऐवढे आहे. मूर्तीला चकचकीत करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून आदि शंकराचार्यांची मूर्ती "तेजस्वी" होऊ शकेल. मूर्तीच्या उभारणीच्या कामात 9 जणांच्या टीमने काम केले. त्याचे काम सप्टेंबर 2020 मध्ये सुरू झाले आणि जवळपास वर्षभर चालू राहिले होते.

हेही वाचा -बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला खेचून आणतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details