महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Reduce sex partners for monkeypox: मंकीपॉक्सचा धोका कमी करण्यासाठी सेक्स पार्टनरची संख्या कमी करा, हू चा सल्ला

मंकीपॉक्सचा धोका कमी करण्यासाठी डब्ल्यूएचओने मोलाचा सल्ला दिला आहे. हू चे प्रमुख म्हणाले की जे पुरुष पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुरक्षित पर्याय निवडले पाहिजेत. सेक्स पार्टनरची संख्या त्यांनी कमी केली पाहिजे.

सेक्स पार्टनरची संख्या कमी करा
सेक्स पार्टनरची संख्या कमी करा

By

Published : Jul 28, 2022, 11:49 AM IST

जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी बुधवारी सल्ला दिला की ज्या पुरुषांना मंकीपॉक्स होण्याचा धोका आहे त्यांनी "काही काळासाठी" लैंगिक भागीदारांची संख्या मर्यादित करण्याचा विचार करावा. युनायटेड नेशन्स एजन्सी WHO ने अलीकडेच अनेक देशांमध्ये मांकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव पाहता जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले की, मांकीपॉक्सचा प्रादुर्भाव मे महिन्यात सुरू झाल्यापासून, त्याची लागण झालेल्यांपैकी ९८ टक्के लोक हे 'गे', 'बायसेक्शुअल' आणि इतर पुरुष आहेत. ज्यांचे पुरुषांशी शारीरिक संबंध आहेत. अशा धोक्याच्या झोनमध्ये येणाऱ्या लोकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की याचा अर्थ असा आहे की जे पुरुष पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुरक्षित पर्याय निवडले पाहिजेत. यामध्ये काही काळासाठी लैंगिक भागीदारांची संख्या कमी करणे समाविष्ट आहे. टेड्रोस म्हणाले की संक्रमित व्यक्तींना वेगळे केले पाहिजे, शारीरिक संपर्कात असलेले मेळावे टाळले पाहिजेत.

हेही वाचा - Monkeypox vaccine: मंकीपॉक्सचे संकट गडद; केंद्र सरकारने लसीसाठी मागवल्या निविदा

ABOUT THE AUTHOR

...view details