नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (कलम 356)चा दाखला देत काँग्रेसच्या काळात कितीवेळा सरकार पाडले हे सांगितले आहे. ते बोलताना म्हणाले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी (कलम 356)चा आधार घेत केरळमधील पहिले सरकार पाडले होते असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्या सभेत बोलताना केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे तरुण मुंख्यमंत्री झालेले शरद पवार यांचेही सरकार असेच पाडले असा आरोप मोदी यांनी यावेळी केला आहे.
केरळमधील पहिले सरकार पाडले :याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने निर्वाचित सरकारं किमान 90 वेळा (कलम 356)चा आधार घेत पाडले आहेत असा थेट आरोप यावेळी बोलताना केला आहे. या काळात आपल्या हुकुमशाही दिसली नाही असे म्हणत मोदींनी या काळात ही सराकरे व्यवस्थित चालत असतना पाडण्यात आली असेही ते म्हणाले आहेत. त्याचवेळी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यकाळावरही मोदी भाषणादरम्यान बोलले आहेत. ते म्हणाले काँग्रेसने (कलम, 356)चा वापर करत जे 90 वेळा सरकार पाडले त्यामध्ये त्याचपद्धतीने इंदिरा गांधी यांनी (50)वेळा सरकार पाडले. याचवेळी पंडित नेहरूंनी केरळमधील पहिले सरकार पाडले. तामिळनाडूत मगर आणि करुणानिधी यांची सरकारे या काँग्रेसवाल्यांनी पाडली. तसेच, तत्कालीन महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांचेही सरकार काँग्रेसने पाडले असही मोदी यावेळी म्हणाले आहेत.
पवारांच पहिल सरकार : शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये असताना ( 1978) मध्ये बंड केले होते. त्यावेळी त्यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात बंड केले. पवार 38 आमदार घेऊन बाहेर पडले. सरकारमधून बाहेर पडताना त्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे वसंतदादांकडे पाठवले होते. त्यापूर्वीच त्यांची जनता पक्षाबरोबरही बोलणी झाली होती. दरम्यान, पवारांनी बंड केल्याचे यशवंतराव चव्हाण यांना कळले, तेव्हा त्यांनी सरकार पाडण्याचा निर्णय थांबवा, असे आवाहन केले होते. परंतु, तोपर्यंत राजीनामे गेले होते. दोर कापले गेले होते. त्यानंतर वसंतदादांचे सरकार कोसळले. दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वाखाली समांतर काँग्रेसची स्थापना झाली. तसेच, राज्यात नवे सरकार आले. त्याला पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) असे नाव देण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आणि पवार पहिल्यांदा स्वतंत्र भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले.