महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vehicle Fire Incident Rudraprayag: केदारनाथ धामचे दर्शन घेऊन परतताना चालत्या वाहनाला लागली आग - Vehicle Fire Incident Rudraprayag

केदारनाथ धामचे दर्शन घेऊन परतत असताना एका चालत्या वाहनाला आज (गुरुवारी) आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील प्रवासी आधीच कारमधून खाली उतरले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Vehicle Fire Incident Rudraprayag
वाहनाला आग

By

Published : May 11, 2023, 7:43 PM IST

Updated : May 11, 2023, 8:33 PM IST

वाहनाला लागलेल्या आगीच्या घटनेविषयी माहिती देताना स्थानिक प्रवाशी

रुद्रप्रयाग (उत्तराखंड):केदारनाथ महामार्गावरील फाट्याजवळ बाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या प्रवाशांच्या वाहनाला आग लागली. गोव्याहून आलेल्या वाहनातील प्रवाशांनी कसा तरी जीव वाचवला. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या स्थानिक लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

गाडी खड्ड्यात पडली: गोव्यातील अमित हा रहिवासी श्री केदारनाथ धामचे दर्शन घेऊन आपल्या हॉटेल जामू फाटा येथे परतत होता. त्याने सांगितले की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कुटुंबासह केदारनाथ धामचे दर्शन करून ते आपल्या हॉटेल जामू फाटा येथे परतत होते. त्यानंतर अचानक मुख्य महामार्गापासून एक किमी अंतरावर जामुकडे येताच होंडा अमेझ (यूके 07 टीबी 3360) या वाहनातून धूर येऊ लागला. हे जाणून चालकाने वाहन बाजूला थांबवले. यानंतर सगळे प्रवासी गाडीतून बाहेर आले. काही वेळातच गाडीने पेट घेतला. त्या ठिकाणी उतार असल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन काही अंतरावर पडली.

स्थानिक लोकांनी केली मदत:त्यांनी सांगितले की, त्या ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे ते कोणालाही घटनेची माहिती देऊ शकले नाहीत. त्याचवेळी तिथून स्थानिक लोक जात होते. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात आली; मात्र आगीत वाहन जळून खाक झाले. यासोबतच ठेवलेले सामानही पूर्णपणे जळून खाक झाले. चौकीचे प्रभारी विजय सैलानी यांनी सांगितले की, यात्रेकरू आणि वाहनात बसलेले चालक सुरक्षित आहेत. यापूर्वीही उत्तराखंडमध्ये धावत्या वाहनाला आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यात काही जणांना जीवसुद्धा गमवाला लागला.

हेही वाचा:

  1. Ujjwal Nikam Reaction: सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही- उज्ज्वल निकम
  2. Raj Thackeray Apology: राज ठाकरेंचा अखेर 'त्या' वक्तव्यावर दिल्ली कोर्टात माफीनामा!
  3. Narayan Rane On Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले; नारायण राणेंनी डिवचले
Last Updated : May 11, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details