महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जमिनीवर ठेवलेल्या रुग्णांना बेड कधी मिळणार, उच्च न्यायालयाचा गोवा सरकारला सवाल

जमिनीवर ठेवलेल्या रुग्णांना बेड कधी मिळणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारला विचारला आहे.

गोवा खंडपीठ
मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ

By

Published : May 18, 2021, 3:45 PM IST

पणजी (गोवा)- राज्यातील 550 खाटा असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सध्या 350 रुग्ण स्थलांतर केले आहेत. काही रुग्णांना अद्याप खाटा उपलब्ध होत नाहीत. त्या केव्हापर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी विचारताना गोव्यातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राकडून प्राधान्यक्रमाने हे लस का मंजूर केले जात नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी सरकारने 5 लाखांच्या लसीची मागणी केंद्राकडे केली असता फक्त 32 हजार डोस पुरविले आहेत, अशी माहिती महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयाला दिली आहे.

रुग्णांना बेड कधी मिळणार

गोवा मेडिकल कॉलेजचे रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी वेगवेगळ्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाक्या बसविण्यात आल्या असल्याने ऑक्सिजन तुटवड्याची समस्या सध्या राहिलेली नाही. वेदांतातर्फे प्रतिदिन 3 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध केला जात आहे. अशाप्रकारे आणखी काही कंपन्या सामाजिक बांधिलकीच्या योजनेतून मदत करणार आहेत का, सध्या 550 खाटा असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 350 रुग्ण स्थलांतर केले आहेत. काही रुग्णांना अद्याप खाटा उपलब्ध होत नाहीत. त्या केव्हापर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहेत, काही रुग्ण अद्यपाही रुग्णालयाच्या वॉर्डात जमिनीवर झोपून उपचार घेत आहेत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला आहे.

रुग्ण शेवटच्या क्षणी येत असल्याने मृत्यू

त्यावर उत्तर देताना महाधिवक्ता देविदास पांगम यांनी येत्या आठवड्यात खाटा उपलब्ध केल्या जातील, असे सुनावणी वेळी सांगितले. गोवा खंडपीठाच्या प्रश्‍नांना उत्तर देताना महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, चिंताजनक असलेले रुग्ण गोमेकॉच्या रुग्णालयात दाखल केले जातात. राज्याच्या इतर जिल्हा व उपजिल्हा कोविड रुग्णालयात चिंताजनक नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच काही रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे गोमेकॉत रुग्णांचे मृत्यू अधिक दिसून येतात. रात्री 2 ते पहाटे 6 पर्यंतचे रुग्णांचे मृत्यू हे प्राणवायू तुटवड्यामुळेच होतात असे नाही, तर रुग्णांना उशिरा रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे ही संख्या मोठी वाटते, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

लसीकरणासाठी लस पडतेय कमी

गोव्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक तसेच दोन हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी सरकारने 5 लाखांच्या लसीची मागणी केंद्राकडे केली असता फक्त 32 हजार डोस पुरविले आहेत. गोव्यातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राकडून प्राधान्यक्रमाने हे डोस का मंजूर केले जात नाहीत, असा प्रश्‍न खंडपीठाने केला. 45 व त्यावरील व्यक्तींनी जर डोस घेतले नाहीत व त्यातील काही उरले तर फुकट न घालवता ते 18 ते 44 वयोगटासाठी वापरता येतील का हे पहावे, अशी तोंडी सूचना खंडपीठाने केली.

हेही वाचा -गोव्यातील नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details