नवी दिल्ली -दिवाळीनंतर गेल्या काही दिवसांत देशातील काही राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनावरील लस कधी येणार याबाबत मोठे विधान केले आहे.
कोरोनावरील लस कधी येणार ?
मोदी म्हणाले की, कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे सांगता येत नाही. लस बाजारात कधी येणार बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही.