प्रत्येक पालकाची त्यांच्या मुलांबद्दल तक्रार असते आणि ते म्हणतात की, त्यांचे मूलं घरी जेवण करित नाही, अभ्यास करत नाही किंवा खूप जास्त आक्रमक होतात, कुणाचं ऐकत नाहीत. आजच्या बिझी शेड्युलमध्ये मुलांना हाताळणं सोपं नसतं आणि अशा परिस्थितीत पालकांकडून काही चुका (When these parenting habits cause children to deteriorate) होतात, ज्याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. चला तर मग जाणुन घेऊया त्या चुकांबद्दल, ज्या पालकांनी लगेच बदलल्या (make these corrections immediately) पाहिजेत. Parenting News
मोबाईलचा अतिरेक :आजकाल मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात बहुतेक पालक अशा चुका करतात आणि बाहेर मैदानात खेळण्याऐवजी मुलांना स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर गेम खेळू देतात. अशा परिस्थितीत स्क्रीन जास्त वेळ वापरल्याने मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यासोबतच मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही बिघडते.
योग्य तेच लाड पुरवा : मुलांच्या प्रत्येक हट्टीपणाची पूर्तता करणे, भविष्यासाठीही घातक ठरू शकते. आजच्या काळात पालक मुलांची शक्ती आणि वेळ वाचवण्यासाठी त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात. अशा परिस्थितीत, मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र माहित नसते आणि ते योग्य आणि चुकीचे यात फरक करू शकत नाहीत.