कर्नाटक (बेंगळुरू) - कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार (Congress MLA Ramesh Kumar) यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्कारावर लाजिरवाणी टीप्पणी केली. या टीप्पणीने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Karnataka MLA Ramesh Kumar Rude Statement) बेळगावी येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना रमेश कुमार यांनी सभापतींशी बोलताना ही टीप्पणी केली. ते म्हणाले 'तुमची स्थिती या म्हणीसारखी आहे, की तुम्ही बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा' असे म्हणाले. त्यावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर त्यांनी ट्वीक करून माफी मागीतली आहे.
मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत
कुमार यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीही त्यांनी बलात्काराच्या मुद्द्यावर असेच वक्तव्य केले होते. गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते. मात्र, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी वेळ देण्यास टाळण्याचा प्रयत्न करत होते. 'तुम्ही जे काही ठरवाल ते मी हो म्हणेन. (Congress MLA Rude Statement) मी विचार करत आहे की तुम्ही परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,' असे सभापतींनी आमदारांना सांगितले.
सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी सांगितले की, 'एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. (Congress MLA Rude Statement In Karanataka Assembly) तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.' दरम्यान, दुर्दैवी गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते काहीच प्रतिक्रिया देताना दिसले नाही. कुमार यांनी यापूर्वी (२०१८-१९) मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.