महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

घरगुती गॅसच्या किमती वाढल्या.. तरुणाने रिक्षातच सुरु केला सरपण कापून देण्याचा व्यवसाय.. - ROBIN USES HYDRAULIC MACHINE TO CUT WOOD

सध्या देशभरात घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडत ( LPG Prices Have Gone Up ) आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याच संधीचा फायदा उचलत केरळमधील कोट्टायम भागातल्या एका तरुणाने रिक्षात सरपण कापून देण्याचे मशीन ( Firewood Cutting In Auto Rikshaw ) बसवले. यातून त्या तरुणाला रोजगाराची संधीही मिळाली आणि लोकांचाही त्रास कमी झाला आहे.

घरगुती गॅसच्या किमती वाढल्या.. तरुणाने रिक्षातच सुरु केला सरपण कापून देण्याचा व्यवसाय..
घरगुती गॅसच्या किमती वाढल्या.. तरुणाने रिक्षातच सुरु केला सरपण कापून देण्याचा व्यवसाय..

By

Published : Mar 30, 2022, 8:01 PM IST

कोट्टायम ( केरळ ) : देशांतर्गत एलपीजीच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडत ( LPG Prices Have Gone Up ) आहेत. अशा परिस्थितीत कोट्टायम येथील एक तरुण उद्योजक सरपण कापून देण्याचा व्यवसाय करत त्यातून उदरनिर्वाह करत आहे. कोविडपूर्वी कुवेत देशातून केरळमध्ये परतलेला रॉबिन अब्राहम आपल्या कामावर परत जाऊ शकला नाही. उदरनिर्वाहासाठी काय करायचे हा त्यांच्यापुढील प्रश्न होता. अशावेळी त्याला कल्पना सुचली. जेव्हा एलपीजीच्या किमती वाढू लागल्या, तेव्हा रॉबिनला सरपण कापण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे ( Firewood Cutting In Auto Rikshaw )सुचले.

फोन केला की रॉबिन सरपण कापायला हजर : त्यासाठी त्याने प्रथम मालाची ऑटो खरेदी केली आणि ऑटोवर हायड्रॉलिक फायरवुड कटिंग मशीन बसवले. त्यानंतर त्याने त्याच्या भागात पोस्टर चिकटवले. लोकांना सरपण कापायचे असल्यास त्याला कॉल करा, असे लिहिले होते. थोड्याच वेळात, रॉबिनला लोकांकडून फोन येण्यास सुरुवात झाली. गॅसच्या दरात वाढ झाल्याने खर्चात वाढ झाल्यामुळे आता अधिकाधिक लोक स्वयंपाकासाठी सरपण वापरत आहेत. रॉबिनचे हायड्रॉलिक मशीन एका तासात एक टन सरपण कापू शकते.

घरगुती गॅसच्या किमती वाढल्या.. तरुणाने रिक्षातच सुरु केला सरपण कापून देण्याचा व्यवसाय..

एक टन लाकूड कापायला ८०० रुपये : रॉबिन म्हणतो की, लाकूड तोडण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा आहे. हे त्याच्या नवीन उपक्रमासाठी एकप्रकारे चांगलेच आहे. रॉबिन त्याच्या निवासस्थानाच्या 3 किलोमीटरच्या भागात ग्राहकांसाठी एक टन सरपण कापण्यासाठी 800 रुपये घेतो. ठिकाणाच्या अंतरानुसार शुल्क बदलते. मला ही कल्पना एका यूट्यूब चॅनलवरून मिळाली आहे. मी एक व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये ही हायड्रॉलिक मशिनरी सादर करण्यात आली होती. त्यानंतर मी त्याबद्दल अधिक चौकशी केली आणि ज्या ठिकाणी हे मशीन वापरले होते त्या ठिकाणी भेट दिली. जेव्हा एलपीजी सर्वसामान्यांसाठी परवडत नाही, तेव्हा मला अशा कुटुंबांसाठी हा दिलासा वाटला. सरपण आकारात कापून टाकणे ही नागरिकांसाठी एक मोठी समस्या आहे. कारण लोकांना हे काम करून घेणे देखील खूप कठीण आहे. आता मला आणखी ऑर्डर मिळत आहेत आणि माझे आता चांगले चालले आहे, असे तो म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details