महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shivaji Maharaja Jayanti 2023 : जाणुन घ्या 2023 मध्ये कधी आहे शिवाजी महाराज जयंती, महाराजांकडून शिकण्यासारख्या गोष्टी

19 फेब्रुवारी 1630 ला पुण्यातील शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला. हा दिवस म्हणजेच 'शिवजयंती' अथवा 'छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती'. 19 फेब्रुवारी 2023 (Shivaji Maharaja Jayanti 2023) रोजी रविवारला 'शिवाजी जयंती' आहे. (things to learn from Maharaja)

Shivaji Maharaja Jayanti 2023
शिवाजी महाराज जयंती

By

Published : Dec 6, 2022, 2:13 PM IST

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. मात्र, तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. 19 फेब्रुवारी 2023 रोजी रविवारला 'शिवाजी जयंती' (Shivaji Maharaja Jayanti 2023) आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. अश्या महान व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु उलगडतात. त्यातुन अनेक गुण शिकण्याजोगे (things to learn from Maharaja) आहेत.

संकटावर मात करणारे शिवाजी महाराज :शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणी आल्या, समस्या आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडचणींवर मात करूनच शिवाजी महाराज पुढे गेले. समस्या आहेत म्हणून शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत, तर जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळत गेले. आग्र्याहून सुटका ही मोहीम याचेच चपखल उदाहरण (things to learn from Maharaja) म्हणावे लागेल.

शिवाजी महाराज जयंती

व्यक्तिमत्वातली जादु : शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात जादु होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला हसत हसत आनंदाने सामोरे जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. स्वराज्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचा ते सन्मान करायचे. एखादा मावळा धारातिर्थी पडला की, कणखर आणि अविचल असलेल्या महाराजांच्या डोळ्यात पाणी यायचे. त्यामुळेच महाराजांच्या एका शब्दासाठी मरायला आणि मारायल मावळे तयार व्हायचे. शिवाजी महाराज कणखर होते. त्यांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. खंबीर आणि अविचल असणाऱ्या महाराजांना समृद्धीचा नियम माहिती होता. शत्रुला लुटून त्याच्याच साधनांनी त्याला मात दिली.

​महाराजांची मानसिक ताकद :शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एखाद्या आख्यायिकेप्रमाणे भासते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता महाराजांनी असे पराक्रम करून दाखवले आहेत, जे केवळ ऐकल्यामुळे अनेकांच्या भुवया आजही उंचावतात. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली, तरी त्यांनी शांत राहून त्यातून मार्ग काढला. सकारात्मक गोष्टींचा आग्रह धरला. शिवाजी महाराजांची देवावर अगाध श्रद्धा होती. त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळत असे.

​सकारात्मकतेचे प्रेरणास्त्रोत :शिवाजी महाराजांची राहणी एकदम साधी होती. स्वारीला गेल्यावर महाराज साध्या तंबुत राहत होते. एवढे अधिकार, एवढे वैभव असूनही महाराज साधेपणाने वागायचे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज प्रोत्साहन द्यायचे, त्यांचं मनोबल वाढवायचे, त्यांना प्रेरित करायचे, उत्साह वाढवायचे. महाराज कधीही चिंतेत राहायचे नाहीत. सकारात्मकतेचा प्रेरणास्त्रोत असलेल्या महाराजांमुळे सर्वांमध्ये एक वेगळी उर्जा यायची. प्रत्येक मावळ्यांसाठी शिवाजी महाराज आदर्श होते.

गनिमी कावा आणिभाला : शिवाजी महाराज नेहमी संयमाने वागायचे. रयतेप्रमाणे मावळ्यांच्या सुरक्षिततेलाही त्यांनी प्राधान्य दिले. आपल्या मावळ्यांसाठी महाराजांनी भाला नावाचे एक हत्यार बनवले. हे हत्यार वापरून फक्त तीनशे मावळ्यांनी एक प्रसंग आपल्या रक्ताने इतिहासात कोरून ठेवला, तो म्हणजे पावन खिंडची घटना. गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडावच केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे ४०० गड-किल्ले होते, असे सांगितले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details