(Narak Chaturdash) किंवा छोटी दिवाळी (Little Diwali) हा सण सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या दिवशी पूजा करून काही उपाय केल्याने जीवनातील दु:खांसोबतच सर्व पाप आणि भीतीपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया, या दिवशी करावयाचे काही उपाय.
छोटी दिवाळीचे महत्व : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो म्हणून याला नरक चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमाच्या नावाचा दिवाही लावला जातो. धार्मिक ग्रंथानुसार छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. ज्योतिष शास्त्रामध्ये या दिवसाचे महत्व सांगून काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, या उपायांनी जीवनात धन समृद्धी तर येतेच पण भय सोबतच पाप-दुःखापासून मुक्ती मिळते.
या दिशेने पूजा करा :छोटी दिवाळीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते, म्हणून या दिवसाला यम असेही म्हणतात. या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावावेत. यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहून प्रार्थना करा. असे केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो.
त्यांची सेवा करा :नरका चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून; मोक्ष दिला होता, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. यासोबतच गायींची सेवा करून त्यांना हिरवा चारा खायला द्या आणि आशीर्वाद घ्या, असे केल्याने धन-समृद्धी आणि देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.