सॅन फ्रान्सिस्को :व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना मेटा आता लवकरच वींडोज बीटावर माडिया शॉर्टकट रिलीझ करत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे सोपे होणार आहे. या अगोदर व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी ड्रॅग आणि ड्रॉप करुन मीडिया फाईल शेअर करत होते. आता मात्र थेट अॅप्लिकेशनमधून फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येणार आहेत. त्याचा फायदा व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना होणार आहे.
व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओ शेअरींगसाठी शॉर्टकट : मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरुन विंडोज बीटा अपडेट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विंडोज बीटा अपडेट केल्यानंतर वापरकर्त्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअरींगसाठी शॉर्टकट फिचर देण्यात आले आहेत. या शॉर्टकट फिटरच्या माध्यामातून वापरकर्त्यांना थेट अॅपलिकेशनमधून फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे व्हॉटसअॅपच्या वापरकर्त्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. व्हॉटस्अॅपवरुन थेट अप्लिकेशनमधून फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येणार आहेत.
व्हॉट्स मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक नवीन वैशिष्ट्य : व्हॉटस्अपवर देण्यात येणारे नवीन वैशिष्ट्य येत्या काही दिवसात अधिक वापरकर्त्यांसाठी आणले जाणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्हॉट्स मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक नवीन वैशिष्ट्य आणत असल्याची चर्चा होती. त्यानुसार वापरकर्त्यांना विंडोज बीटावर कॉलसाठी सूचना देणार होते. त्यामुळे अनपेक्षित समस्येमुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर फोन असताना देखील कॉलसाठी सूचना दिसू शकतात. त्यामुळे वापरकर्ते त्या कॉलची सूचना रद्द करून मॅन्युअली दोष निराकरण करू शकत असल्याचे म्हटले होते.