नवी दिल्ली - सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी शुक्रवार 'ब्लॅक फ्रायडे' ठरला. जवळपास अर्धा तास फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा सर्व्हर डाऊन झाल्याने भारतासह जगातील अनेक देशातील वापरकर्ते अस्वस्थ झाले. अडचणी येत असल्याने लोकांनी त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर लोकांनी व्यक्त याबद्दल बरेच काही लिहिले. यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम पूर्ववत झाल्यावर लोकांना हायसे वाटले.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने वापरकर्ते नाराज - सोशल मीडिया डाऊन ब्लॅक फ्रायडे
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्याने लोकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यात त्रास झाला. अॅप्स उघडत होते, परंतु फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या बातम्यांचे फीड रिफ्रेश होते नव्हते. हे तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुमारे अर्धा तास बंद राहिले, त्यानंतर लोकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, व्हॉट्सअॅपने आपल्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करून सर्व्हर 45 मिनिटे डाऊन झाला आहे, तुमच्या धैर्याबद्दल धन्यवाद, असे ट्विट केले होते. फेसबुककडे इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी आहे. त्यांच्यासमोर ट्विटर ही एकमेव प्रतिस्पर्धी कंपनी असल्याने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाउन झाल्याने लोकांनी ट्विटरवर त्यांची चेष्टा-मस्करी करणारे ट्विट केले.