नवरात्रीचा पवित्र सण (Navratri 2022) फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात संपूर्ण नऊ दिवस (during the nine days of Navratri) देवी दुर्गेची विधिवत पूजा केली जाते. मातेकडून आपल्या सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना केली जाते. यादरम्यान देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते. लोकांच्या श्रद्धेचा ओघ पाहण्यासारखा असतो. नवरात्री मध्ये भाविक पुजा -अर्चा, व्रत वैकल्ये करतात. तसेच, या काळात पाळावयाचे काही नियम (what to do and what not to do) पुढील प्रमाणे आहेत, ते जाणुन घेऊया.
नवरात्री मध्ये काय करावे? (what to do)
1. हा एक अतिशय पवित्र सण आहे. म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळदेखील स्वच्छ करा.
2. पहिल्या दिवशी (प्रतिपदा तिथी) कलश प्रतिष्ठापना, मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी.
3. दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा. आरती दोन्ही वेळा करा.
4. दुर्गा सप्तशतीचे पठण करा, माते दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा.
5. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा.
6. नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.
7. पूजा झाल्यानंतर मां दुर्गाची आरती करावी. पूजेमध्ये कोणतीही उणीव किंवा चूक झाली तरी ती आरतीद्वारे पूर्ण होते.