मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तौक्ते चक्रीवादळ आले आहे. चक्रीवादळामुळे कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून 18 मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल आणि त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरातला पार करत पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल, अशी माहिती आयएमडीने दिली. त्यामुळे शनिवारी दक्षिण कोकण आणि गोवाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मराठवाड्यात वेगाने वारे वाहतील -
चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी व सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल. शनिवारी रायगड येथेही वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, नांदेड तसेच सांगली, सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे आणि कोल्हापूरसह मराठवाडा प्रदेशात शुक्रवारी वादळी वार वाहण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळात अशी काळजी घ्या -
- मच्छीमार आणि अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जाऊ नये.
- आपले घर सुरक्षीत असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहा. घराच्या बाहेर पडू नका.
- घर मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये असल्यास सुरक्षित स्थळी जा.
- पशुधन आणि अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवा
- रेडिओ ऐका, त्यातून हवामानासंदर्भातील माहिती मिळत राहते.
- चक्रीवादळाबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि चुकीची माहिती पसरवू नका.
- अफवांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःदेखील त्या पसरवू नका. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.
- न शिजवता खाता येईल, असे भरपूर अन्न गोळा करून ठेवा. झाकून ठेवलेल्या भांड्यात स्वच्छ पाणी झाकून ठेवा. तसेच औषधे जवळ ठेवावी.
- चक्रीवादळ इशारा मिळाल्यानंतर पुढील 24 तास दक्ष राहा.
- जेव्हा तुमचा परिसर चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येण्याचा इशारा असेल तेव्हा समुद्र किनाऱ्याजवळील सखल भागातून दूर जा.
- काचेच्या खिडक्यांवर सुरक्षा कवच लावा
- तुमच्या घरातील विजेचा मुख्य पुरवठा बंद करा
- तुमच्याजवळील कंदील, टॉर्चेस किंवा इतर आवश्यक दिवे चालू स्थितीत आहेत. याची खात्री करा आणि त्यांना सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवा.
- निवासस्थानाकडे जाण्याची सूचना मिळाल्याशिवाय निवारा सोडू नका.
- चक्रीवादळानंतर विजेच्या खांबांपासून सुटलेल्या वारांपासून लांब राहा