श्रावण महीना सुरु झाला की महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरु होते. त्यातही विदर्भात काही वेगवेगळ्या सणांची प्रथा आहे. त्यातही काही सण असे आहे की, ते सण साजरे करण्याची प्रथा केवळ नागपूरातचं आहे. यामध्ये मारबत Black Marbat,Yellow Marbat व बडग्या Badgya हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच history of marbat procession आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक History behind Marbat वारसा. पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक Nagpur Marbat Festival History 2022 परंपरा लाभली आहे. Eda Pida Rog Rae Gheun Ja Ge Marbat
मारबत व बडग्या मिरवणुकी मागचा इतिहासभोसले घराण्यातील बांकाबाई हिने ईग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध, म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही, म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी नागपूर व जवळपासच्या गाव खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहान मुलांना घेउन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच असते. शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरांना हा एक विरंगुळा वाटतो. ईग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो.
कसे तयार होतात मारबतही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून, घेऊन जा रे मारबत घेऊन जा रे मारबत असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर उभे असतात.