महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पोर्नोग्राफी आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे? वाचा...

राज कुंद्रावरील पोर्नोग्राफीच्या आरोपांनंतर पॉर्न आणि इरोटीक सिनेमांविषयी चर्चा होताना दिसत आहे. पॉर्न आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे इंटरनेटवरही इरोटीक (erotic) हा शब्द आता सर्च होताना दिसत आहे.

पोर्नोग्राफी आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे? वाचा...
पोर्नोग्राफी आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे? वाचा...

By

Published : Jul 27, 2021, 1:19 PM IST

मुंबई :पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने तिचा पती पॉर्न नव्हे तर इरोटीक चित्रपट बनवतात असे म्हटले होते. राज कुंद्राच्या वकिलांसह त्याचे समर्थन करणारे व्यक्तीही याच वाक्याची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. यामुळे पॉर्न आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे हा प्रश्न अनेकांना पडला असेल. इंटरनेटवरही इरोटीक (erotic) हा शब्द आता सर्च होताना दिसत आहे.

इरोटीक म्हणजे काय?

कामुक किंवा कामोत्तेजक असा Erotic या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ होतो. जे साहित्य पाहिल्याने, वाचल्याने किंवा ऐकल्याने कामोत्तेजना (sexual excitement) वाढते अशा साहित्याला इरोटीक असे संबोधले जाते. कामोत्तेजना वाढविणाऱ्या चित्रपटांचाही यात समावेश होतो. या चित्रपटांत नग्नता किंवा थेट लैंगिक कृत्ये दाखविले जात नाही. केवळ हावभाव आणि कलेच्या माध्यमातून कामुकता दाखविली जाते.

पॉर्न म्हणजे काय?

पोर्नोग्राफीक साहित्यात संपूर्णपणे लैंगिक कृत्ये दाखविले जातात. यात केवळ नग्नताच नव्हे तर संभोगही पूर्णपणे दाखविला जातो. हे साहित्य पूर्णपणे सेक्सवर आधारीत असते. जगभरात हजारो संकेतस्थळांवरून अशा प्रकारचे साहित्य प्रसारीत होताना दिसते. दोन व्यक्तींमधील संभोग यात स्पष्टपणे दाखविला जातो. पॉर्न इंडस्ट्रीत आजघडीला अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. पॉर्न साईटसवरील व्हिडिओही वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकृत केलेले दिसतात. अनैसर्गिक सेक्सचाही यात समावेश असतो.

बॉलीवूड, हॉलीवूडमध्येही बनतात बोल्ड सिनेमे

याशिवाय मोठ्या पडद्यावर रिलीज होणारे अनेक चित्रपट बोल्ड आणि अडल्ट कॅटेगरीत गणले जातात. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजमध्येही अनेकदा न्यूड सीन्स दाखविले जातात. हे चित्रपट विशिष्ट वयोगटातील प्रेक्षकांसाठीच असतात. याला सेन्सॉर बोर्डाकडून ए श्रेणीतील प्रमाणपत्रही दिले जाते. मात्र पॉर्न बनविणे भारतात पूर्णपणे बॅन आहे. चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये दाखविली जाणारी नग्नता पॉर्नमध्ये मोडत नाही. कारण यात नग्नता आणि बोल्डनेस असतो मात्र पॉर्नप्रमाणे सेक्स दाखविला जात नाही.

इरोटीक चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग

पॉर्नप्रमाणेच इरोटीक चित्रपटांचाही जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या प्रेक्षकांना लक्षात ठेवूनच असे सिनेमे तयार केले जातात. यावेळी सिनेमातील कंटेट इरोटीक कॅटेगरीत येईल याची पुरेपुर काळजी घेतली जाते. चित्रपट क्षेत्रात ही इंडस्ट्री स्वतंत्रपणे काम करताना दिसते.

इरोटीक आणि पॉर्नमधील फरकानेच राज कुंद्राला मिळेल दिलासा?

पोलिसांनी राज कुंद्राला पॉर्न चित्रपट बनविण्याच्या आरोपात अटक केली आहे. मात्र वकिलांनी ते चित्रपट पॉर्न नव्हे इरोटीक असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. भारतात पॉर्न बनविण्यावर बंदी आहे, मात्र पॉर्न पाहण्यास बंदी नाही. कुंद्रावर पॉर्न तयार करणे आणि अॅपद्वारे प्रसारीत करण्याचा आरोप आहे. त्यामुळे पॉर्न आणि इरोटीकमधील फरक हाच राज कुंद्राला दिलासा मिळण्याचा मार्ग असल्याचे बोलले जात आहे.

राज कुंद्राच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

राज कुंद्राच्या वकिलांनीही कोर्टात युक्तिवाद करताना संबंधित अॅपवरील चित्रपट पॉर्न नव्हे तर इरोटीक असल्याचे म्हटले आहे. या साहित्याला पॉर्न म्हणणे योग्य नाही. यात दोन व्यक्तींमधील संभोग किंवा लैंगिक कृत्य दाखविलेले नाही. त्यामुळे याने संबंधित आयटी कायद्यातील कलमांचा भंग होत नसल्याचा युक्तिवाद कुंद्राच्या वकिलांनी केला आहे.

इरोटीक आणि पॉर्नवर तज्ञांचे मत काय?

अमेरिकेतील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एफ सेल्टजर यांनी 2011 मध्ये इरोटीक आणि पोर्नोग्राफीतील फरकावर एक लेख लिहिला होता. त्यांच्या मते इरोटीक कंटेटमधून आपल्याला कशामुळे उत्तेजना मिळते आणि कशामुळे नाही हे कळण्यास मदत होते. हे एका कलेप्रमाणे आहे, हे योग्य रितीने केले तर प्रेक्षक आनंदी होऊन कलाकाराचे कौतुकही करतात. याउलट पॉर्न चित्रपटांचा असा विशिष्ट प्रभाव राहत नाही. पॉर्नमुळे तत्काळ सेक्स एक्साईटमेंट वाढते. कुणीही कोणताही पॉर्न व्हिडिओ किंवा फोटो वारंवार बघत नाही. कारण ही कला नाही. पॉर्न हा सरळ पैसा कमाविण्याचा मार्ग आहे. यात कसलिही कला नाही. याशिवाय पॉर्नमध्ये पुरूष आणि महिलेचे शारीरीक सौंदर्य दाखविले जात नाही. याचा फोकस त्यांना एक वस्तू म्हणून दाखविण्यावर असतो. याचा उद्देश केवळ तत्काळ वासना पूर्ण करणे हा असतो.

पॉर्नवर ओरड मात्र ओटीटीवरील सॉफ्ट पॉर्नवर मौन?

राज कुंद्राच्या अटकेनंतर पोर्नोग्राफीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झडताना दिसत आहे. मात्र यामुळे ओटीटीवरील सॉफ्ट पॉर्नचा मुद्दाही चर्चेत आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटला अनेक लोक सॉफ्ट पॉर्न संबोधतात. अनेक तज्ञांच्या मते रचनात्मक स्वातंत्र्याच्या नावावर प्रेक्षकांना सॉफ्ट पॉर्न, बीभत्स आणि रक्तरंजित दृश्ये दाखविले जातात. याशिवाय ओटीटीवरील कंटेटचे समर्थन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टीव्ही किंवा सिनेमातील कंटेटपेक्षा हे जास्त रचनात्मक असल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. ओटीटी हेसिनेमा किंवा टीव्हीप्रमाणे सार्वजनिक व्यासपीठ नसून ते आपण एकांतात बघू शकतो असेही या वर्गाचे म्हणणे आहे.

हेही वाचा -पोर्नोग्राफी प्रकरण : शर्लिन चोप्रा - पुनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा, शर्लिन आज गुन्हे शाखेसमोर हजर होणार

ABOUT THE AUTHOR

...view details