हैदराबाद - संसदेच्या मान्सून अधिवेशनाची सुरूवात आज जोरदार गदारोळात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा मुद्दा समोर आल्याने भारताच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या मुद्यावर विरोधकांनी चर्चा करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे, की आम्हाला माहिती आहे, की भारतातील नेते, अधिकारी व पत्रकारांची हेरगिरी करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय मीडिया संगठना (international media organization) ने खुलासा केला आहे, की इजराइलचे साफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारताचे दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते व एक न्यायाधीशासह 300 लोकांची हेरगिरी केले गेली आहे. पेगासस स्पाइवेयर निर्माण करणारी कंपनी एनएसओ ( NSO) इजराइलची आहे. कंपनीचा दावा आहे की, केवळ सरकारलाच अधिकृत रूपाने या सॉफ्टवेअरची विक्री केली जाते. याचा उद्देश्य दहशतवाद व गुन्हे रोखणे आहे. प्रश्न असा आहे, की काय भारत सरकारने एनएसओ (NSO) कडून हे सॉफ्टवेयर खरीदी केले होते. दरम्यान गार्जियन वृत्तपत्राचे म्हणणे आहे, की एनएसओ (NSO) ने हे सॉफ्टवेअर अनेक देशांना विकले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 50 हजाराहून अधिक लोकांची हेरगिरी केली जात आहे.
काँग्रेसकडून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी -
काँग्रेसने सोमवारी दावा केला की, इस्त्राईली कंपनीचे स्पाइवेयर पेगासस (Israeli Spyware Pegasus) चा वापर करून काँग्रेस नेते राहुल गांधींसह अन्य विरोधी नेत्यांची तसेच माध्यम समुहांची हेरगिरी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा नाहीतरी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.