महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Odisha Train Accident : कवच असते तर वाचला असता शेकडो प्रवाशांचा जीव, ओडीशातील तिहेरी रेल्वे अपघातासाठी कोण आहे जबाबदार? - काय आहे रेल्वे कवच

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातासाठी रेल्वेचे कवच जबाबदार आहे. ज्या मार्गावर हा अपघात झाला आहे, त्यावर कवच प्रणाली वापरण्यात आलेली नव्हती अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी दिली आहे. काय आहे ही कवच तंत्रज्ञान जाणून घेऊ..

What is Kavach safety system
काय आहे कवच सेफ्टी?

By

Published : Jun 3, 2023, 6:04 PM IST

Updated : Jun 3, 2023, 6:42 PM IST

हैदराबाद: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री रेल्वेचा तिहेरी अपघात झाला. आतापर्यंत झालेल्या रेल्वे अपघातापैकी हा सर्वात मोठा अपघात आहे. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस आणि माल वाहतूक करणारी रेल्वेमध्ये हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात कसा झाला याची माहिती रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी दिली आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती देताना शर्मा यांनी अपघाताचे कारण सांगितले.

यामुळे झाला अपघात : ज्या मार्गावर तिहेरी ट्रेन रुळावरून घसरली त्या मार्गावर 'कवच' सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याची माहिती रेल्वेच प्रवक्ते शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान या अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या वारसांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी असलेल्यांना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान या अपघाताला कवच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच या रेल्वेच्या मार्गावर नवी टेक्नॉलॉजी कवच याचा प्रयोग करण्यात आला नव्हता त्यामुळे हा अपघात झाला आहे.

कवच' म्हणजे काय: 'कवच' सुरक्षा प्रणाली भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या धावत्या गाड्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी स्वदेशी स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कवच प्रणालीची सुरूवात केली होती. वैष्णव यांच्यामते ही एक एसआयएल 4 प्रमाणित तंत्रज्ञान आहे. सुरक्षेसाठी उत्तम तंत्रज्ञान असल्याचे ते म्हणाले होते. प्रणाली विमान वाहतूक मधील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रमाणे काम करते. कवच सुरक्षा प्रणाली म्हणजे लोकोमोटिव्ह पायलटला सिग्नल पासिंग अॅट डेंजर (SPAD) टाळण्यात मदत करते. याशिवाय हिवाळ्यात दाट धुके झाले असेल अशा प्रतिकूल हवामानात देखील रेल्वेच्या वाहतुकीसाठी ही प्रणाली रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी मदतगार असते. साधरण 2020 मध्ये या प्रणालीची चर्चा सुरू झाली होती. नॅशनल ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिमला कवच टेक्नॉलॉजी म्हटले जाते. याला आरडीएसओने तयार केले आहे. भारतीय रेल्वेकडून 2022 मध्ये याचा वापरही सुरु केला होता.

काय आहे कवच तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्ये : कवच प्रणालीमध्ये अपघात टाळण्यासाठी टक्करविरोधी उपाय म्हणून आपोआप ब्रेक लागण्याचे तंत्रज्ञान आहे. हे स्वयंचलित ब्रेक हवामान बदलाच्या वेळी उपयुक्त ठरतात. धुके असतील तर उच्च वेगाने आणि थेट लोको -टू- लोकमध्ये संवाद घडवून आणते आणि धोका टाळत असते. त्याचबरोबर केबिनमध्ये लाइन-साइड सिग्ल डिस्प्ले सुधारत असते. यामुळे रेल्वेच्या समोरा-समोर धडकण्याच्या घटना कमी होतात. दरम्यान भारतात हे तंत्रज्ञान जेव्हा आले तेव्हापासून रेल्वेच्या समोरासमोरील धडक होणे कमी झाले होते. याच यंत्रणेचा वापर अपघात झालेल्या मार्गात करण्यात आलेला नव्हता.

हेही वाचा -

  1. Train Tragedy Live Update : ओडिशातील रेल्वे अपघात २६८ जणांचा मृत्यू, पंतप्रधान घटनास्थळी पोहोचले
  2. Odisha train accident: बालासोर रेल्वे अपघाताचे मदतकार्य पूर्ण, मृतांच्या संख्येत वाढ
  3. PM Modi Visit Balasore: रेल्वे अपघातस्थळ घटनास्थळी पंतप्रधान पोहोचले, रुग्णालयातील जखमींचीही करणार विचारपूस
Last Updated : Jun 3, 2023, 6:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details