महाराष्ट्रात दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीपासून सुरू होते. या दिवशी संपूर्ण राज्यातील शेतकरी वसुबारस (Vasu Baras) हा विशेष सण साजरा करतात. या दिवशी समुद्रमंथनातून कामधेनू प्रकट झाली असे मानले जाते. आणि दरवर्षी याच दिवसाच्या स्मरणार्थ शेतकरी कामधेनू स्वरूपा गौमातेची देशभरात ठिकठिकाणी पूजा करण्याची (what is importance of Vasu Baras life of a farmer) परंपरा आहे.
वासरासहित गायीची पूजा : या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.
शेतकऱ्यांच्या जीवनातील वसुबारसेचे महत्त्व :शेतकऱ्यांच्या जीवनात गाय आणि वासरांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा सण मुळात गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची संयुक्त पूजा केली जाते. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात.