दरवर्षी दिवाळीचा सण (Diwali Celebration) कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. दिव्यांचा हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या दिवाळीच्या या सणात माता लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा केली जाते. यासोबतच संपूर्ण घर दिव्यांनी, पणतीं, इत्यादींनी सजवले जाते. पौराणिक कथेनुसार लंकापती रावणाचा वध करून, भगवान राम १४ वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत परतले. भगवान श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या आगमनाच्या जयघोषात संपूर्ण अयोध्या तुपाच्या दिव्यांनी सजली होती. तेव्हापासून दिवाळीचा सण साजरा केला जाऊ लागला. जाणुन घेऊया दिवाळी सणाचे महत्व (what is importance of Diwali Festival) , तारीख, शुभ वेळेसह (complete calendar with auspicious time) संपूर्ण कॅलेंडर.
दिवाळी सणाचे संपुर्ण मुहुर्त : यावर्षी 24 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी दिवाळी आहे. लक्ष्मी पूजन मुहूर्त 24 ऑक्टोबर सोमवार रोजी संध्याकाळी 06.53 ते 08.16 पर्यंत आहे. अभिजीत मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:19 ते दुपारी 12:05 पर्यंत आहे. अमृत काल मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 08.40 ते 10.16 पर्यंत आहे. विजय मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:36 ते दुपारी 02:21 पर्यंत आहे. तर संधिप्रकाश मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:12 ते 05:36 पर्यंत आहे.
दिवाळीचे महत्त्व :दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुट्टी असते. हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते. साडे तीन मुहुर्तापैकी एक हा दिवाळीच्या दिवशीचा मुहुर्त असल्याचे म्हणटले जाते. दिवाळी हा सण हिंदू लोकांचा फार मोठा सण आहे. अनेक मोठ्या कामांची सुरुवात करण्यासाठी लोक दिवाळीच्या मुहुर्ताची वाट बघत असतात
दिवाळीची खरेदी :साधारण पणे नवरात्राला सुरुवात झाली की, नागरीकांची दिवाळीची खरेदी करण्याची लगबग सुरु होते. आणि दसरा पार पडला की मात्र, मार्केटमध्ये सर्वत्र खरेदी करण्याची वर्दळ दिसुन येते. दिवाळी हा सण हिंदु धर्मातील मोठा सण असल्याने, साधारणत: सर्वच नागरिक काहीना काही खरेदी करण्यास बाहेर पडतात. कपडे, घर सजावटीच्या वस्तु, आकाशदिवा, रांगोळी, ईत्यादी अनेक गोष्टी नागरिक प्रामुख्याने खरेदी करत असतात. अशी आहे दिवाळी दिनदर्शिका :23 ऑक्टोबर रविवार रोजी धनत्रयोदशी आहे. 24 ऑक्टोबर, सोमवार रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन आहे. 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी गोवर्धन पूजा आहे. 26 ऑक्टोबर बुधवार रोजी भाऊ बिज व पाडवा आहे. Diwali Celebration