योग, तंत्र, ध्यान आणि आयुर्वेदात चक्र ही एक अतिशय मूलभूत संकल्पना आहे; शरीरातील विविध केंद्रांमधून ऊर्जा किंवा प्राण कसे फिरतात हे यामाध्यमातुन स्पष्ट होते. पण चक्र (what is Chakra meditation) म्हणजे काय? तर चक्र हे तुम्ही वापरत असलेली ऊर्जा वाढविण्याचं काम करते. चक्रांमध्ये प्रचंड ऊर्जेचा साठा असतो. जेव्हा चक्र इष्टतम स्थितीत काम करतात, तेव्हा ते संतुलित असतात. परंतु जेव्हा या चक्रांच संतुलन बिघडते. तेव्हा आपल्याला थकवा, यशाचा अभाव, अस्वस्थता, हिंसा, क्रोध अश्या असंख्य गोष्टींना समोर जावे लागते. म्हणुन आपले चक्र संतुलित ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. तेव्हाच आपण सकारात्मक ऊर्जेने जीवन जगू शकु. utility news
सात चक्रे : मनुष्य शरीरात 'सात चक्रे' (Seven Chakra) असतात. पहिल्या चक्राला मणीचक्र म्हणतात. हे चक्र इतर सर्व चक्रांना जोडतात. आणि शेवटचे चक्र मुकुटाच्या शीर्षस्थानी असते ते सातवे चक्र आहे. योग्य प्रकारे ध्यान केल्यास या चक्रांची शक्ती वाढते. आणि आपल्या सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होत असतो. चक्र हे आपल्या सर्व विचारांचे, भावनांचे, आठवणींचे, अनुभवांचे आणि कृतींचे भांडार आहेत आणि जेव्हा आपण अधिक आध्यात्मिक जीवनाकडे वळतो तेव्हा, तेव्हा जीवन जगतांना येणाऱ्या अडचणी, दु:ख यावर सहजतेने आणि विश्वासाने मात करु शकतो. त्यामुळे आपले चक्र जाणीव पुर्वक (Chakra meditation benefits) चांगले करणे, हे आपलं कर्तव्य आहे.
रेकीचा अवलंब करा : आपल्या शरीरातील प्रत्येच चक्र हे आपल्या मज्जातंतु सोबत जुळलेले असते. त्यामुळे आगदी सुप्त अवस्थेत देखील जेव्हा आपण काही विचार करित असतो, आणि कालांतराने तोच विचार आपल्या पुढे प्रत्यक्ष रुपात उभा असतो. आपली चक्रे ही थेट आपल्या भावनिक, मानसिक आणि सब कॉन्शिअस माईंड सोबत जुळलेले असते. त्यामुळे आपण जेव्हा दुख:, क्रोध आणि वाईट स्थिती अनुभवतो तेव्हा आपल्या शरीरीतील ऊर्जा संपल्याची जाणीव आपल्याला होते. तर जेव्हा आपण आनंद, समाधान, प्रेमाचा अनुभव करतो, त्यावेळी आपले शरीर हे ऊर्जेने ओतप्रोत भरलेले असते. त्याचवेळी आपण जीवनाचा खरा आनंद अनुभवत असतो. म्हणुन आपल्याला आपण सदैव आपली चक्रे ऊर्जेने भरलेले कोणत्या पध्दतीने (Chakra meditation application) ठेवणार हे शिकुन घ्यायला हवे. आणि हे तंत्र शिकण्याच्या याच प्रकाराला रेकी (Reiki) म्हणतात.
चक्र ध्यान : रेकी द्वारे एका विशिष्ट चक्राकडे लक्ष केंद्रित केले (Chakra meditation process) जाते आणि नंतर मंत्राची मानसिक पुनरावृत्ती केली जाते आणि ध्वनी शक्ती शरीराच्या त्या भागात पाठविली जाते. ही प्रक्रिया मार्गदर्शनाखाली केल्या गेल्यास फायदेशिर ठरते. प्रथम चक्र किंवा मूलाधार चक्र, दुसरे चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र, तिसरे चक्र किंवा मणिपुरा चक्र, चौथे चक्र किंवा अनाहत चक्र, पाचवे चक्र किंवा विशुद्धी चक्र, सहावे चक्र किंवा अजना चक्र, सातवे चक्र हे मुकुट चक्र किंवा सहस्रार चक्र असते. रेकी द्वारे ज्या पध्दतीने ही सात चक्रे संतुलित केल्या जातात, त्यालाच चक्र ध्यान म्हणतात.