महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Duleep Trophy Champion : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभाग बनला चॅम्पियन, १९व्यांदा पटकावली दुलीप ट्रॉफी - दुलीप ट्रॉफी न्यूज

यशस्वी जैस्वाल (265) यांचे द्विशतक ( Yashasvi Jaiswal double century ) आणि जयदेव उनाडकट (6 विकेट) यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर, पश्चिम विभागाने रविवारी दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव करत दुलीप करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

Duleep Trophy Champion
दुलीप ट्रॉफी

By

Published : Sep 25, 2022, 4:27 PM IST

कोईम्बतूर: दुलीप करंडक ( Duleep Trophy ) क्रिकेट स्पर्धेचा अंंतिम सामना रविवारी पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभागा यांच्यात पार पडला. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दक्षिण विभागावर मात केली. ज्यामध्ये पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव ( West Zone defeated South Zone by 294 runs ) केला. या सामन्यात शम्स मुलाणी, यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान यांचे योगदान मोलाचे राहिले. ज्याच्या जोरावर पश्चिम विभागाने अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) नेतृत्वाखाली विक्रमी 19व्यांदा दुलीप ट्रॉफीवर कब्जा केला.

रविवारी पहिल्या डावातील पिछाडीवरुन जोरदार पुनरागमन केले. यासह पश्चिम अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विभागाने विक्रमी 19व्यांदा दुलीप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. 529 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभागाने सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्यांचा दुसरा डाव 6 बाद 154 धावांवर सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा संपूर्ण संघ 234 धावांत गारद झाला. यामध्ये रवी तेजाने 53 धावा केल्या. पण त्याच्या या खेळीमुळे फक्त पराभवाचे अंतर कमी होऊ शकले.

पश्चिम विभागाकडून डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणीने ( Spinner Shams Mulani ) 51 धावांत चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय जयदेव उनाडकट ( Jaydev Unadkat ) आणि अतित सेठ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. यशस्वी जैस्वाल (दुसऱ्या डावात 265 धावा) आणि सरफराज खान (दुसऱ्या डावात 127 धावा) आणि उनाडकट यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीनं पश्चिम विभागाच्या मोठ्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

पहिल्या डावात 57 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम विभागाने त्यांचा दुसरा डाव 4 बाद 585 धावांवर घोषित केला. पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात दक्षिण विभागाने 327 धावा करत आघाडी घेतली होती.

हेही वाचा -INDW vs ENGW 3rd ODI : शेवटचा धावबाद नियमानुसारच होता, कर्णधार हरमनप्रीत कौरचे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details