डायमंड हार्बर (पश्चिम बंगाल): एका सात वर्षांच्या मुलीवर गेल्या सहा वर्षांपासून तिचे वडील आणि काका सातत्याने बलात्कार करत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला ( Minor girl sexually abused by father and uncle ) आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी दोघांना सोमवारी रात्री कोलकात्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली तेव्हा ही घटना समोर आली.
सासू करत होती समर्थन :"ती फक्त दीड वर्षांची होती तेव्हापासून ते हे करत आहेत. मी जेव्हा त्यांना थांबवायला गेलो तेव्हा ते माझ्यावर शारीरिक अत्याचार करतात आणि माझ्यासमोर लहान मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवतात. माझी सासू देखील समर्थक होती. माझा नवरा आणि माझा दीर. मी असहाय होते. इतक्या दिवसांनी मला तक्रार करण्याची संधी मिळाली. पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील, अशी आशा आहे," असे मुलीच्या आईने औपचारिकपणे तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
प्रौढ चित्रपट पाहायला लावले :तथापि, पोलीस सूत्रांनी पुष्टी केली की, इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असलेली मुलगी तिचे वडील आणि काका यांच्याकडून सतत लैंगिक अत्याचाराला बळी पडली होती. "त्यांनी मुलीला प्रौढ चित्रपट पाहण्यास भाग पाडले. मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे आम्ही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे," असे डायमंड हार्बर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.