महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जींनी सर्वांना विनामूल्य कोविड-19 लस मिळण्याचे केले जाहीर - ममता बॅनर्जी कोविड-19 लस न्यूज

'आमचे सरकार कोविड-19ची लस राज्यातील सर्व लोकांना विनाशुल्क मिळावी, यासाठी व्यवस्था करीत आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे,' असे ट्विट बॅनर्जी यांनी केले आहे.

ममता बॅनर्जी कोविड-19 लस न्यूज
ममता बॅनर्जी कोविड-19 लस न्यूज

By

Published : Jan 10, 2021, 1:19 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की, राज्य सरकार राज्यातील प्रत्येकासाठी मोफत लसीकरण मिळण्याची व्यवस्था करेल. त्यांनी एका ट्विटमधून ही घोषणा केली.

'आमचे सरकार कोविड-19ची लस राज्यातील सर्व लोकांना विनाशुल्क मिळावी, यासाठी व्यवस्था करीत आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे,' असे ट्विट बॅनर्जी यांनी केले आहे.

हेही वाचा -फार्मर माईंड... रिकाम्या बाटल्या, बांबूचा वापर करत पठ्ठ्यानं शेतात पोहचवलं पाणी

दरम्यान, केरळ, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश यासह इतर अनेक राज्यांनी यापूर्वी राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी मोफत लसीकरण जाहीर केले होते. केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोविड-19 लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून देशात सुरू होणार आहे.

अहवालानुसार, मुख्यतः 3 कोटी आघाडीच्या कामगारांना ही लस उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि विविध आजार असलेल्या रुग्णांना ही लस दिली जाईल. कोविड-19 विरुद्धच्या देशातील लढाईतील हे एक 'महत्त्वाचे पाऊल' असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. लसीकरणातील समस्या ओळखण्यासाठी व लसीकरण मोहीम राबवण्यासाठी उत्तम पद्धती शोधण्यासाठी कोविड-19 लसींचे 'ड्रायरन' देशामध्ये घेण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे.

ताज्या अहवालानुसार, रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोविडच्या 18 हजार 645 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 4.5 लाख लोकांना संसर्ग झाल्याचे आकडा गाठला आहे. शिवाय, ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन 'कोविड स्ट्रेन'ची लागण झालेल्यांची संख्या देशात 90 झाली आहे.

हेही वाचा -तेलंगाना : १५ बालकामगारांची सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details