महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुवेंदू अधिकारी यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नाही - Suvendu Adhikari resignation

तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नसून त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी 16 डिसेंरला राजीनामा दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष
विधानसभा अध्यक्ष

By

Published : Dec 18, 2020, 5:44 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुका असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नसून त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. राजीनाम्यात तारीख स्पष्ट न केल्यामुळे तो स्वीकारला नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

सुवेंदू अधिकारी यांनी 16 डिसेंरला राजीनामा दिला आहे. सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांना पत्रही लिहले होते. राजकीय प्रतिशोधाच्या भावनेतून त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्नात असलेल्या पोलीस आणि प्रशासनाला थांबवण्यासाठी राज्यपालांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावीत, असे सुवेंदू यांनी पत्रात म्हटलं होतं. राज्यपालांना पत्र लिहण्यापूर्वी सुवेंदू यांनी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता ब‌ॅनर्जी यांना आपल्या राजीनाम्याबाबत कळवले होते.

सुवेंदू यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर टीएमसीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. भाजपामध्ये सुवेंदू यांना एखादे चांगले पद मिळेल, असे वाटत नाही. कारण, यापूर्वी अनेक जण भाजपामध्ये गेले आहेत. मात्र, त्यांना योग्य पद मिळाले नाही. मुकुल रॉय यांना भाजपामध्ये गेल्यानंतर योग्य पदाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तसेच सुवेंदू यांनाही मिळाणार नाही, असे सौगत रॉय म्हणाले.

तृणमूल काँग्रेसला खिंडार -

तृणमूल काँग्रेसला गळती लागली असून अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम करत आहेत. हे नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बुधवारी तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा - तृणमूल काँग्रेसला खिंडार, पुन्हा एका आमदाराचा तृणमूलला रामराम

ABOUT THE AUTHOR

...view details