नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांमध्ये नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. (Berlins iconic Brandenburg Gate) जर्मनीतील बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनिवासी भारतीयांनी उत्साहात स्वागत केले आहे. अनिवासी भारतीयांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांना एका चिमुकलीने अनोखी भेट देत स्वागत केले. तीने नरेंद्र मोदी यांचे चित्र रेखाटले होते.
नरेंद्र मोदी यांनी या चिमुकलीने रेखाटलेल्या चित्रावर स्वाक्षरी करुन तिला शाबासकी दिली. नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या लहान मुलांशी संवाद देखील साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना तेथील मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना ते भेटले.