महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - परदेशात जाण्याची संधी

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 11:33 AM IST

मेष :येणारा आठवडा आपणास आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल. ह्या आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. कुटुंबात थोडा दुरावा येऊ शकतो, परंतु कामे मजबुतीने होतील. आपण आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. असे असले तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो. ह्या आठवड्यात व्यापारातील पाऊले विचारपूर्वक उचलावी लागतील. आपणास एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो. व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारीत तणाव वाढू शकतो, तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रासलेले असू शकतात. आपण व आपला जोडीदार ह्यात समजूतदारपणाचा अभाव असल्याने येणारा आठवडा वैवाहिक जीवनासाठी कठोर असेल. नात्यात दुरावा येऊ शकतो. जोडीदाराची रागीट वृत्ती आपणास पसंत पडणार नाही. जोडीदाराची प्रकृती सुद्धा बिघडू शकते. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले नाते अधिक दृढ होईल. आपल्यातील जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ : येणारा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. खोळंबलेली कामे झाल्याने आपण हर्षित व्हाल. आपला आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील स्थिती मजबूत होईल. आपला वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा आपणास नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानकपणे झालेल्या ह्या वाढीमुळे आपण काहीसे घाबरून जाल, परंतु धीर धरा. प्राप्तीत कपात संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव राहील. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास गेल्याने ताजेतवाने वाटेल व तणाव दूर होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपल्यात विनाकारण भांडण होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम केल्या नंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवते. आपले परिश्रम यशस्वी होतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन : येणारा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. येणारा आठवडा आपल्या प्रकृतीसाठी तसेच प्रणयी जीवनासाठी अनुकूल नसल्याचे आपणास ध्यानात ठेवावे लागेल. आपण खूप आजारी पडू शकता, तेव्हा काळजी घ्यावी. पोटाशी संबंधित विकार आपणास त्रस्त करू शकतात. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे आपणास महागात पडू शकते. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा प्रतिकूल आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात वाढत असलेल्या तणावामुळे चिंतीत असल्याचे दिसून येईल. ते त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील राहून वाटचाल करतील. व्यापारासाठी आठवडा फायदेशीर असला तरी आपला मानसिक ताण वाढेल. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करण्याऱ्यांसाठी आठवडा चांगला असला तरी त्यांच्या समोर आव्हाने भरपूर असल्याने ते नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

कर्क :येणारा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आपल्या व्यापारात तेजी येईल व काही नवीन ऑर्डर्स सुद्धा मिळतील. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा एखादा मोठा फायदा होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपण एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. प्रॉपर्टीशी संबंधित कामात आपण यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील व त्याचा आपणास फायदा होईल. ह्या दरम्यान आपली बँकेतील शिल्लक वाढेल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. जोडीदाराची साथ आपणास प्रगती करण्यास प्रेरित करेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा प्रतिकूल आहे. कुटुंबियांमुळे आपल्या प्रणयी जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात किंवा कुटुंबातील गढूळ वातावरणामुळे आपले प्रणयी जीवनावरील लक्ष इतरत्र जाईल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल, म्हणून ती वाढविण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील.

सिंह : येणारा आठवडा आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आजारी पडण्याची संभावना आहे व त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या बेचेन असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे मधले दिवस चांगले आहेत. आपल्या मना प्रमाणे कामे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. आठवड्याच्या अखेरीस आपण खूपच चिंतातुर व्हाल व त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा थोडी काळजी घ्या व कोणताही वाईट विचार करू नका. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने होऊ घातलेली सर्व कामे अधिक जलद गतीने होतील. इतकेच नव्हे तर प्रलंबित कामे सुद्धा होऊ लागतील. नोकरीतील स्थिती चांगली असेल. तेथील परिस्थिती आपणास अनुकूल असल्याचा फायदा आपल्याला मिळेल. व्यापाऱ्यांना सुद्धा आठवडा अनुकूल आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील चिंता दूर करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या प्रेमिकेस वारंवार भेटण्याचा प्रयत्न करतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना एकाग्रतेचा अभाव असल्याचे जाणवेल. तेव्हा सावध राहून खूप मेहनत करावी.

कन्या :येणारा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या मनातील विचार बोलून दाखवू शकाल व त्यामुळे आपले प्रणयी जीवन बहरून उठेल. आपल्यातील जवळीक वाढेल. आपण आपल्या प्रेमिकेच्या हृदयात स्थान पक्के करू शकाल. विवाहितांचे जीवन चढ - उतारांसह वाटचाल करेल. आपण व आपला जोडीदार असे दोघेही आरोग्य विषयक कोणत्या ना कोणत्या समस्येस बळी पडू शकता. तसेच दोघातील समन्वय कमी सुद्धा होऊ शकतो. असे असले तरी आपल्या नात्यासाठी थोडा वेळ काढल्यास सर्व काही सुरळीत होईल. येणारा आठवडा व्यापारास अत्यंत फायदेशीर आहे. आपले कौशल्य व आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र आपणास आपल्या कनिष्ठां पासून थोडे सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात ते आपणास काही त्रास देऊ शकतात. येणारा आठवडा प्रवासास सामान्यच आहे. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होऊ शकतो.

तूळ :येणारा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण घरातील काही कामे कराल. आपल्या प्राप्ती वाढ तर खर्चात कपात झाल्याने आपण हर्षित व्हाल. येणारा आठवडा व्यापारासाठी चढ - उतारांचा आहे. आपणास ज्या कामाचा अनुभव किंवा ज्ञान नसेल असे कोणतेही काम हाती घेऊ नका. शासना विरुद्ध असलेले कोणतेही काम सुद्धा करू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण खूप मेहनत कराल व आपणास चांगले सहकार्य सुद्धा मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घेऊ शकतील. जोडीदारामुळे आपणास चांगला लाभ होईल. त्यांच्यामुळे जो काही लाभ आपणास होईल, त्या बद्धल आपणास त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद लुटू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक : येणारा आठवडा आपणास अनुकूल आहे. मित्रांची भेट होऊन खूप मनोरंजन होईल. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. आठवड्याच्या सुरवातीस प्रवासाची संधी मिळेल. खर्चातील वाढ आपली काळजी वाढवू शकते. खर्चाच्या प्रमाणात प्राप्ती थोडी कमीच होईल. त्यामुळे आपणास अंदाजपत्रावर थोडे लक्ष घालावे लागेल, अन्यथा काळजी वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असली तरी आपली धावपळ वाढेल. काही जणांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तेथे जाऊन काही दिवस नोकरी करावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या व्यापार वृद्धीसाठी काही गुंतवणूक सुद्धा कराल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्यात दुरावा निर्माण होईल किंवा भांडण होईल असे कोणतेही कृत्य करू नका. विवाहित व्यक्तींना कौटुंबिक कारणांसाठी खर्च करावा लागेल. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्यच आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे.

धनु : येणारा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण ज्याचा विचार केला होता व ज्याची अपेक्षाही ठेवली नव्हती अशी सर्व कामे ह्या आठवड्यात होतील. प्रलंबित योजना सुरु झाल्याने नोकरी असो किंवा व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करू शकाल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. ह्या आठवड्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्राप्तीत जलद गतीने होणारी वाढ. ह्या झालेल्या वाढीव रकमेची गुंतवणूक आपण अशा ठिकाणी कराल कि ज्यामुळे भविष्यात सुद्धा आपण त्याचा लाभ घेऊ शकाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी होण्याची संभावना आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष ठेवावे. पोटाशी संबंधित विकार आपणास त्रस्त करू शकतात. आठवड्याचा अखेरचा दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक विघ्नांना सामोरे जावे लागेल व त्यामुळे त्यांना अभ्यासावर जास्त एकाग्र होण्याची आवश्यकता भासेल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमीजन मात्र काहीसे त्रासलेले दिसतील.

मकर : येणारा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. खर्चात कपात होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत चढ - उतार येऊ शकतात. एखाद्याचे वायफळ बोलणे आपल्या डोक्यास ताप देऊ शकते व त्यामुळे आपण क्रोधीत होऊन वेडे वाकडे बोलून कामाच्या ठिकाणी भांडण उकरून काढू शकाल. शक्यतो अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. आपली क्षमता वाढेल. आपल्या परिश्रमामुळे आपणास एखादी चांगली निविदा सुद्धा मिळू शकते. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. परंतु, जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आपण चिंतीत होऊ शकता. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्यातील समन्वय बिघडू शकतो. तेव्हा तो लवकरात लवकर संतुलित करण्याचा प्रयत्न करावा. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत खूप मेहनत करतील.

कुंभ :येणारा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही खर्च अचानकपणे होतील. नोकरी करणाऱ्या वक्तींनी आपल्या कामाच्या बाबतीत थोडे सतर्क राहावे. ह्या दरम्यान आपल्या कामावर सर्वांच्या नजरा असल्याने कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका. बदली संभवते. जर आपली इच्छा असेल तर ह्या आठवड्यात नोकरी बदलण्यात सुद्धा आपण यशस्वी होऊ शकाल. व्यापारी योजना यशस्वी होतील. कामा निमित्त प्रवास करावे लागतील व त्यामुळे आपण यशाच्या मार्गा पर्यंत जाऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांसा व्यतिरिक्त आकर्षण सुद्धा राहील. नात्यात एकमेकांप्रती आदर सुद्धा वाढेल. येणारा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल असला तरी आपल्या प्रेमिकेस तिच्या जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत तिला मदत करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणात यश प्राप्ती उत्तम होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल असल्याचे दिसत आहे.

मीन : येणारा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. सुरवात खूप चांगली होईल. ह्या दरम्यान आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आपले नवीन संपर्क होतील. ह्या आठवड्यात आपणास एखादा सुंदर प्रवासास जाऊन सुट्टी मजेत घालविण्याची संधी मिळेल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आपल्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. आपण जर विवाहित असाल तर आपले वैवाहिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा. अडेलतट्टूपणा केल्याने नाते सुधारण्या ऐवजी बिघडू शकते. त्या पासून दूर राहा. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास आपणास अनेक ठिकाणांहून फायदा होऊ शकतो. आपणास कोठून हि पैसे मिळू शकतात. खर्च कमी झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांच्या कामात प्रगती होईल. येणारा आठवडा विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारा आहे. ते चांगली तयारी करून आपल्या अभ्यासात प्रगती करतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हेही वाचा :

  1. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्ती करतील जोडीदारासोबत पर्यटनाचे आयोजन ; वाचा लव्हराशी
  3. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना दूरचे प्रवास करण्याची संधी; वाचा राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details