महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - वैवाहिक जीवनातील प्रेम

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 1:52 AM IST

Updated : Sep 17, 2023, 6:30 AM IST

मेष: आठवड्याच्या सुरवातीस आपणास थोडे सावध राहावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील प्रेम वृद्धिंगत झाल्याने ते खुश होतील. असे असले तरी जोडीदाराची प्रकृती काळजीस कारणीभूत होऊ शकते. प्रणयी जीवन सुखावह झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरीत स्थिती आपणास अनुकूल असेल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. खूप कष्ट कराल व त्यामुळे पदोन्नतीचा मार्ग सोपा होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. एकीकडे आपणास लाभ मिळू लागतील तर दुसरीकडे कामात काही अडथळे निर्माण होतील. काही कायदेशीर बाबींचा त्रास संभवतो, तेव्हा त्यावर लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होणार असल्याने आर्थिक नियोजन करण्यावर भर द्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्तम अध्ययन करू शकतील. कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. एखादी दुर्घटना संभवत असल्याने वाहन जपून चालवावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी, संततीच्या प्रकृतीमुळे काळजी वाटू शकते. प्रेमीजनांसाठी आठवडा त्रासदायी आहे. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तेव्हा काळजी घ्यावी व संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या प्रगतीने खुश असल्याचे दिसून येईल. आपले मन हर्षित होईल. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापारात फायदा झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते कामाच्या ताणातून मुक्त होतील. असे असले तरी वरिष्ठांशी जुळवून घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात खर्च सुद्धा वाढतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एकाग्रचित्त होण्यात अडथळे येऊ शकतात. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्यात चढ - उतार होताना दिसून येईल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपणास आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता. कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यास थोडा जास्तच वेळ लागू शकतो. कुटुंबीय एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याशी बोलणी करू शकतात. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत आपणास लाभ होऊ शकतो. आपण जर एखादी प्रॉपर्टी विकण्याचा विचार करत असाल तर ती विकल्याने सुद्धा लाभ होऊ शकतो. व्यापारात स्थिती मजबूत होईल. आपणास सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठा लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना आपल्या मित्रांची व सहकाऱ्यांची पुष्कळ मदत होईल. ते आपणास सहकार्य करतील व त्यामुळे नोकरीतील स्थिती आपणास अनुकूल होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने सामान्यच आहे. कोणतीही मोठी समस्या दिसत नाही. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनातील तणाव निवळतील. सासुरवाडी कडील लोक आपल्या पाठीशी राहून आपणास समजून घेतील. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या एखाद्या मित्राच्या मदतीने आपल्या आवडीच्या व्यक्तीस मागणी घालू शकता व तिला एखादी महागडी वस्तू भेट सुद्धा देऊ शकता. आपण खुश व्हाल व सर्वांशी प्रेमाने वागण्याचा विचार कराल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आशीर्वादाने आपले एखादे खोळंबलेले काम होण्याची संभावना असल्याने घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नोकरीच्या ठिकाणी आपले कष्ट व निष्ठा बघून आपली प्रशंसा होईल व लोक आपला आदर करतील. आपली पगारवाढ सुद्धा संभवते. व्यापारासाठी आठवडा चढ - उतारांचा असला तरी हळू हळू स्थितीत सुधारणा होऊ लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. विशेषतः आठवड्याच्या सुरवातीस अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळाल्याने ते खुश होतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

सिंह :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. नात्याच्या बाबतीत अनेकदा आपसात बोलणे होईल व आपण प्रेम विवाहासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येईल. विवाहित व्यक्तींच्या आयुष्यात तणाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने ते आपले वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. त्यांच्यातील तणाव वाढण्यास एकमेकांची चिडचिड सुद्धा कारणीभूत ठरू शकते. ह्या आठवड्यात आपल्या प्रयत्नांना अंकुर फुटतील व त्यामुळे आपण काहीतरी नवीन करत असल्याचे दिसून येईल. एखादे साहस करण्याचा विचार कराल. काही मित्रांसह फिरावयास सुद्धा जाऊ शकता. ह्या आठवड्यात खर्च जरी झाले तरी प्राप्ती सुद्धा चांगली झाल्याने काळजीस जागा उरणार नाही. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना काही त्रास जाणवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्यात चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल, तेव्हा आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसत आहे. विवाहित व्यक्तींनी जर वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही चांगले होईल. जोडीदार सुद्धा आपणास पूर्ण पाठिंबा देईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या प्रेमिकेच्या सर्व प्रवृतींवर नजर ठेवावी लागेल. तिच्यासह जास्तीत जास्त वेळ घालविण्याची आपली इच्छा असेल. प्रॉपर्टीत केलेल्या गुंतवणुकीतून लाभ झाल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. किरकोळ खर्च झाले तरी काळजी करण्या सारखे काही नाही. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असेल. आपले वरिष्ठ आपल्या पाठीशी असल्याचे दिसून येईल व त्यामुळे आपणास चांगली कामगिरी करण्यास मदत होईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या हाती एखादी मोठी ऑर्डर लागू शकते व त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. आपणास आपल्या भावाच्या मदतीने सुद्धा एखादे मोठे काम मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करताना दिसतील. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. आरोग्यास कोणताही त्रास होणार नाही. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल असला तरी आठवड्याच्या मधल्या दिवसात प्रवास केल्यास जास्त चांगले परिणाम मिळतील.

तूळ : ह्या आठवड्यात विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद लुटतील. ते जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकतात. ते परदेशी जाण्याची सुद्धा संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्य आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या समस्यांचे निराकरण करण्यात तिला मदत सुद्धा कराल. हा आठवडा खर्च करण्याचा आहे. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींवर सुद्धा खर्च होऊ शकतो. परंतु त्याने आपण खुश व्हाल. एखादे नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकता. त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात आनंद पसरेल. आई - वडिलांचे आशीर्वाद मिळतील. प्राप्तीत वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल व त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊन आपली कामे होऊ लागतील. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा लाभ होईल. नोकरी व व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण उत्तम कागिरी करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहे. सध्या त्यांना एकाग्रता वाढवून लक्षपूर्वक अभ्यास करावा लागेल. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्यात किरकोळ चढ - उतार येतील. आठवड्याची सुरवात वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक: हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन ते आपल्या दांपत्य जीवनाचा आनंद लुटतील. प्रेमीजनांच्या जीवनात चढ - उतार आले तरी नात्यात आपुलकी असल्याचे त्यांना जाणवेल, जी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. आपणास अचानक धनलाभ संभवतो. हे धन आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येईल. आपली कामे झाल्याने आपणास यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपली पदोन्नती संभवते. आपण आपले नांव सार्थक कराल व खूप परिश्रम करून उत्तम परिणाम मिळवाल. व्यापारात सुद्धा यशस्वी होण्याची प्रबळ संधी मिळून आपण प्रगती साधू शकाल. एखाद्या महिलेसह किंवा व्यापारी भागीदारासह काम केल्यास अधिक लाभ होण्याची संभावना आहे. नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. त्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची सुद्धा संभावना आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अर्थात कोणतीही मोठी समस्या होईल असे दिसत नाही. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी वाढलेला दुरावा कमी होईल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण व आपली प्रेमिका एकमेकांना समजून घ्याल व त्यामुळे समस्या कमी होतील. ह्या आठवड्यात आपणास एखादे मोठे पद मिळण्याची संभावना आहे. त्यामुळे आपल्या पद - प्रतिष्ठेत वृद्धी होईल. आपली प्राप्ती सुद्धा वाढेल. आपण खुश व्हाल आपल्या आनंदात कुटुंबियांना सुद्धा सहभागी करून त्यांना एखादी मोठी पार्टी सुद्धा देऊ शकाल. कामा निमित्त परदेशाशी सुद्धा चांगला संपर्क साधू शकाल किंवा आपणास मोठ्या पदाची नोकरी सुद्धा मिळू शकेल, जिचा स्वीकार करण्यात आपण मागेपुढे काही पाहणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. वेळेचा फायदा उचलून व्यापार वृद्धी करावी. गुंतवणुक करून सुद्धा आपणास लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. उच्च शिक्षणात ते चांगले परिणाम प्राप्त करतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा झाली तरी पोट दुखीची समस्या संभवते. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे.

मकर : ह्या आठवड्यात आपणास प्रगतीची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य व प्रेम ह्यामुळे आपले वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपल्या मनातील विचार प्रेमिके पासून लपवून न ठेवता तिला ते मोकळेपणाने सांगा. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती वाढेल व त्यामुळे आर्थिक आव्हानातून बाहेर पडण्याची संधी आपणास मिळेल. मानसिक तणाव कमी होतील. घरातील वातावरण सौख्यदायी असेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी आपले लक्ष वेधून घेतील. धर्म कर्मात विश्वास वाढेल. नोकरीतील स्थितीत चढ - उतार येतील. नोकरीत बदली होण्याची संभावना आहे. व्यापारात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल. आपणास शिष्यवृत्ती सुद्धा मिळू शकते. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तणावामुळे त्रास होऊ शकतो. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे. आपण एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास सुद्धा करू शकता.

कुंभ: ह्या आठवड्यात काही त्रास होऊ शकतो. आपल्या पूर्णत्वास आलेल्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. परंतु धीर सोडू नका. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत हळू हळू सुधारणा होऊ लागेल विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप होईल. जोडीदार आपल्या मनातील सर्व काही आपणास सांगेल. त्यामुळे आपल्यातील गैरसमज दूर होऊन जवळीक वाढेल. असे असले तरी सासुरवाडीशी काही वाद होण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपल्या नात्यातील विरोधाभास आता दूर होऊ शकतो. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण खूप मोठी गुंतवणूक कराल. ह्या दरम्यान आपल्या व्यापार वृद्धीसाठी आपणास भांडवली गुंतवणूक सुद्धा करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. आपली प्रतिष्ठा खंडित होईल असे कोणतेही कृत्य करू नका. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य विषयक किरकोळ समस्या होऊ शकते. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन :हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रेमीजनांना मात्र थोडे सावध राहावे लागेल. आपली एखादी लहानशी चूक सुद्धा प्रेमिकेच्या नजरेत मोठी ठरेल. तिची मनधरणी करणे अवघड होईल. तेव्हा सावध राहावे. आठवड्याची सुरवात चांगली होईल. परंतु, आठवड्याच्या अखेर पर्यंत खर्च वाढत राहतील, त्यावर आपणास नियंत्रण ठेवावेच लागेल. त्यासाठी आर्थिक नियोजन कौशल्य पूर्वक करावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. काही अडथळे येतील, परंतु भविष्यात हे अडथळेच आपल्यासाठी लाभदायी ठरतील. नोकरी करणाऱ्यांनी अनुकूल वातावरणाचा फायदा उचलावयास हवा. आपणास वरिष्ठांच्या नजरेत उंचीवर जाण्याची संधी मिळेल. त्यासाठी आपण खूप परिश्रम सुद्धा कराल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. अभ्यासात त्यांचे मन रमेल. एखाद्या स्पर्धेची तयारी करत असल्यास त्यांना यश प्राप्त होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल; वाचा लव्हराशी
  2. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्ती प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतील; वाचा राशीभविष्य
  3. Today panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
Last Updated : Sep 17, 2023, 6:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details