महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा येणारा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य - आठवडा राशी

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 1:46 AM IST

मेष : हा आठवडा आपणास नवीन ऊर्जा देणारा असला तरी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करून काम करावे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात संतुष्ट असल्याचे दिसून येईल. त्यांची जोडीदाराशी जवळीक वाढेल. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या बौद्धिक विचारांने खूप प्रभावित व्हाल व तिची साथ मिळाल्याने अत्यंत खुश व्हाल. ह्या आठवड्यात खर्च कमी होतील. प्राप्तीत वाढ झाल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती अधिक चांगली होईल. आपल्यावर एखादा नवीन पदभार सोपवला जाऊ शकतो. पदोन्नतीची संभावना असल्याने आपले काम अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात सुद्धा काही नवीन संपर्कांचा लाभ होईल. परंतु एखादी व्यक्ती आपणास आव्हान देऊन आपली काळजी वाढवू शकते. तेव्हा थोडे सावध राहा. शासन - प्रशासन यांचे सहकार्य मिळाल्याने आपली कामात प्रगती होईल. विद्यार्थी आपल्या बुद्धिमतेचा योग्य वापर करतील. त्यामुळे त्यांचा विकास होईल. स्मरणशक्ती वृद्धिंगत झाल्याने अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. घरात आनंद पसरेल. एखाद्या वाहनाची खरेदी सुद्धा करू शकाल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ: हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. त्यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल. प्रणयी जीवनात रोमांस वाढला तरी अधून - मधून वाद होण्याची संभावना आहे. मित्रांच्या मदतीने एखादे नवीन काम हाती घेऊ शकता. प्राप्तीत वाढ झाल्याने मन आनंदून जाईल. मन आनंदित झाल्यामुळे आपण नोकरीत पूर्ण उत्साहाने व जोशाने कामे कराल. असे असले तरी अधून - मधून राग सुद्धा येईल. आपला हा राग आपण सभोवतालच्या लोकांवर काढण्याची संभावना असल्याने त्या पासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. अन्यथा कार्यालयीन वातावरण बिघडून आपणासच त्रास होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात नफा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या प्रकृतीच्या बाबतीत बेफिकीर राहिल्यास मोठी किंमत चुकवावी लागू शकते. रुग्णालयात सुद्धा दाखल व्हावे लागू शकते. तेव्हा प्रकृतीची योग्य काळजी घ्या. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील सुखद क्षणांचा आनंद उपभोगू शकतील. ते जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकतील व त्यामुळे त्यांचे दांपत्य जीवन सुखद होईल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सामान्यच आहे. आपले प्रणयी जीवन अधिक सुखावह करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रेमिकेस एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकता. आपल्या कामात चांगली गती असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे आपल्या कार्य कौशल्याची ओळख निर्माण होईल. आपले वरिष्ठ आपल्या कामाच्या पद्धतीने प्रभावित होतील. व्यापाऱ्यांना आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. काही लोक आपल्या कामात बिघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. ह्या आठवड्यात प्रकृतीच्या बाबतीत आपण काहीसे उदासीन असाल, परंतु हि मोठी चूक ठरू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहितांना तर हा आठवडा अत्यंत चांगला आहे. ते त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा असू शकतो. त्यांनी आपल्या प्रणयी जीवनात त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नये, अन्यथा नात्यात कटुता येण्याची संभावना आहे. आपणास कुटुंबीयांचा सहवास मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने आपण कोणतेही काम यशस्वीपणे करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे सावध राहून आपली कामे करावीत. कोणत्याही व्यक्तीस आपल्या कामात निष्कारण सहभागी करू नये. अन्यथा आपलेच नुकसान होईल. आपल्या कामाचा अहवाल त्वरित वरिष्ठांना दिल्यास आपली कामगिरी त्यांच्या नजरेस भरेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या परिश्रमाचे यथायोग्य फळ मिळेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

सिंह: हा आठवडा आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल आहे. विवाहितांसाठी आठवडा बराचसा प्रतिकूलच आहे. वैचारिक मतभेदांमुळे थोडा तणाव वाढू शकतो. परंतु तो संवादाने सुद्धा दूर करता येऊ शकतो. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपले परिश्रम यशस्वी होऊन आपणास सुखद परिणाम मिळतील. वरिष्ठांशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. व्यापाऱ्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. आपण एखादा नवीन व्यापारी सौदा करू शकाल. त्याने आपणास मोठा लाभ होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणावामुळे आपल्या प्रकृती व्यतिरिक्त महत्वाच्या कामात त्रास होऊ शकतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आठवड्याच्या सुरवाती पासूनच काही मल्टीव्हीटॅमिन्सचा वापर आपण करू शकता. आठवड्याचा पहिला दिवस वगळून इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या: हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. कौटुंबिक तणाव दूर करण्यासाठी आपणास कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या मदतीने प्रयत्न करावे लागतील. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावातून हळू - हळू बाहेर पडून आपसातील समन्वय सुधारण्याचा प्रयत्न करतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्य विषयक समस्या कमी होतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेस एखादी मोठी भेटवस्तू देऊ शकता. कदाचित प्रेमिकेसह बाहेर खाण्या - पिण्यास जाण्याची संधी मिळू शकते. हा आठवडा प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. आपले विचार पूर्णतः योग्य दिशेस नसल्याने आपल्या मनात काही गैरसमज निर्माण होऊन आपण स्वतःच आपल्या आनंदाच्या योजनेत बाधक होऊ शकता. त्यामुळे काही महत्वाच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची संभावना आहे. अशा वेळी कोणतेही मोठे काम हाती न घेण्यातच शहाणपणा आहे. जर कोणाची मदत घ्यावी लागलीच तर ज्याच्यावर आपला विश्वास असेल निव्वळ त्याचीच मदत घ्यावी. नोकरीत आपण प्रयत्नरत असल्याचे दिसून येईल व त्यामुळे आपली स्थिती मजबूत होईल. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. जास्त प्रयत्न करून सुद्धा लाभ कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांच्या मदतीने शिक्षणात चांगली कामगिरी करू शकतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन जोडीदाराशी जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा प्रतिकूल आहे. आपण जर सावध न राहिलात तर नाते तुटण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आपल्या स्थितीत चढ - उतार येत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती चांगली राहील. कामा निमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल असू शकतो. तेव्हा सावध राहावे. विवाहितांच्या वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक व सामंजस्य असल्याचे दिसून येईल. एकमेकांच्या सहवासात फिरावयास जाण्याचे नियोजन होऊ शकते. प्रेमीजनांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. ह्या आठवड्यात काही वेळा आपण प्रेमळ संवाद साधाल तर काही वेळा वाद सुद्धा होतील. असे असून सुद्धा नाते टिकून राहील. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करू नका. कोणत्याही प्रकारच्या चिटफंडात पैसा गुंतवू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणाला उसने पैसे सुद्धा देऊ नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. एखाद्या कामगिरीने आपली प्रशंसा सुद्धा होऊ शकते. तसेच नवीन प्रकल्प सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे आपण खुश व्हाल. वरिष्ठांशी आपला समन्वय उत्तम राहील. तो आपल्यासाठी फायदेशीर होईल. व्यापाऱ्यांसाठी आठ्वडास चांगला आहे. आपण काही नवीन लोकांच्या सहकार्याने कामात प्रगती करून चांगला फायदा मिळवू शकाल. आपल्या व्यापाराच्या कामासाठी दूरवरच्या प्रवासाची योजना सुद्धा आखू शकाल. विद्यार्थ्यांना अडथळे आले तरी महत्वाच्या विषयांवर पकड मिळविण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी दुरावा वाढू शकतो, तेव्हा काळजी घ्यावी. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल असला तरी मनात एकमेकां बद्धल काहीसा अविश्वास सुद्धा निर्माण होऊ शकतो. तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. आपणास कुटुंबियांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होईल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींकडे आपण आकर्षित व्हाल. नोकरीत स्थिती चांगली राहिली तरी कोणाशी चुकीचे वर्तन केल्यास आपले नुकसान होईल. असे असले तरी नशिबाची साथ मिळाल्याने पदोन्नती सुद्दा संभवते. व्यापाऱ्यांना त्यांच्या कष्टांचे यथायोग्य फळ मिळेल. एखादा मोठा फायदा होऊ शकेल असा मोठा सौदा त्यांच्या हाती लागेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत गंभीर असल्याचे दिसून येईल. आपणास मित्रांचा पाठिंबा मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. असे असले तरी जास्त प्रोटीनयुक्त आहार करणे टाळावे. हा संपूर्ण आठवडा प्रवासास प्रतिकूल असल्याने शक्यतो प्रवास करणे टाळावे.

मकर : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक सौख्य मिळेल. कौटुंबिक दायित्वाची पूर्तता होईल. मातेच्या आशीर्वादाने महत्वाची कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नात्यात प्रेम व रोमांस वाढल्याने नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. प्रेम विवाह संभवतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यापाऱ्यांना प्रवास केल्याने लाभ होईल. काही प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होईल. व्यापारासाठी त्यांचा पाठिंबा मिळेल. शासनाकडून एखादी नोटीस मिळू शकते. एखादे जुने प्रकरण बाहेर येऊ शकते, तेव्हा सावध राहावे. संततीसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होईल व त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा आरोग्यास चांगला असला तरी बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना आपले वैवाहिक जीवन सुखद असल्याची जाणीव होईल. जोडीदाराशी समन्वयात सुधारणा होईल. त्याने आपणास दिलासा मिळेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपली आपल्या प्रेमिकेस खुश करण्यासाठी काहीही करण्याची तयारी राहील. ह्या आठवड्याच्या सुरवातीस मित्र व कुटुंबियांसह सहलीस जाण्याची योजना आखून एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. त्याने आपणास तजेला व नावीन्य जाणवू लागेल. नोकरीत परिश्रम करावे लागतील. परिश्रम केल्यास आपण यशस्वी होऊ शकाल. आपणास पदोन्नती मिळण्याची संभावना सुद्धा आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपली गुंतवणूक सुद्धा आपणास चांगला लाभ मिळवून देईल. व्यापार वृद्धीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रवाहात परतण्यासाठी पालकांच्या पाठिंब्याची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनाचे सौख्य लाभेल. संपत्तीशी संबंधित वाद संभवतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यात प्रेम टिकून राहील, तसेच नात्यातील जवळीक सुद्धा वाढेल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांनी संवाद साधून सौख्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या पूजेसाठी किंवा मंदिरासाठी दान देऊ शकता. त्याने आपणास शांती लाभून आपली प्रतिष्ठा सुद्धा वाढेल. आठवड्याच्या सुरवातीस एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास सुद्धा आपण करू शकाल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वृद्धी होईल. व्यापारात नवीन परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आपण विरोधकांवर मात कराल. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत सुद्धा यश प्राप्ती होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हेही वाचा -

  1. Today Love Horoscope : या राशींच्या व्यक्तींचा दिवस मनोरंजन आणि आनंदात जाईल; वाचा लव्हराशी
  2. Today Horoscope : या राशींच्या व्यक्तींना मिळेल जनमानसात मान-सन्मान, वाचा राशीभविष्य
  3. National News in Marathi: मराठी बातम्य, Latest Bharat News & Updates - ETV Bharat

ABOUT THE AUTHOR

...view details